रुईकर कुटूंबियांना शिवसेनेतर्फे ५ लाखाची मदत; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी घेतली कुटुंबियांची भेट!

32

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)9075913114

गेवराई(दि.28डिसेंबर):-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, त्यांना दिर्घायुष्य लाभावं म्हणून पायी तिरुपती वारी करताना कट्टर शिवसैनिक असलेल्या सुमंत रुईकर यांच्यावर रस्त्यातच काळाने घाला घातला. त्यांचे वारी दरम्यान निधन झाले. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी बीड येथे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन आधार दिला. यावेळी रुईकर कुटूंबियांना शिवसेनेतर्फे ५ लाखाची मदत करण्यात आली. यावेळी रुईकर यांच्या पत्नीला नोकरी, मुलांच्या उच्चशिक्षणाचा खर्च शिवसेनेने उचलला आहे. शिवसेना लवकरच त्यांना पक्के घर देणार असल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, त्यांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी रुईकर यांनी पायी तिरुपती वारीस सुरुवात केली होती. मात्र रस्त्यातच त्यांचे निधन झाले. मात्र आता त्याचे कुटुंब उघडल्यावर पडू नये म्हणून शिवसेनेने सगळी जबाबदारी उचलली आहे. त्यानुसार सेनेचे औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडून ५ लाख रुपयांची तातडीची मदत देण्यात आली आहे. चंद्रकांत खैरे यांनी बीड येथे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना आधार दिला.

आपला कर्ता माणूस जरी गेला असेल तरी तुम्ही एकटे नाहीयत, तुमच्यासोबत उद्धवजी आहेत, संपूर्ण शिवसेना कुटुंब आहे, असे चंद्रकांत खैरेंनी यावेळी रुईकर कुटुंबाला सांगितले. तसेच शिवसेना पक्ष हा सदैव रुईकर कुटुंबियांच्या पाठीशी राहील, असे सांगितले. यावेळी माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षिरसागर, विधानसभा संघटक राजू वैद्य, जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.