वनविभागाने हटविले मारकंडा कंनसोबा बस थांब्यावरिल अतिक्रमण

29

🔹पोटाची भाकर हिरावल्याने व्यवसाईक चिंताग्रस्त

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.27डिसेंबर):-चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कंनसोबा येथील बस थांब्यावरील अतिक्रमण वनविभागाने हटविले त्यामुळे पोटाची खडगी भरण्यासाठी चहापाणी विक्रेते आता चिंताग्रस्त झाले आहेत.मार्कंडा कंनसोबा येथील बसथांब्यावर १९६५ पासून नारायण सुशिल चक्रवर्ती व १९६७ पासून राबिण पंचानंद मंडल हे आपल्या कुटुंबाची खडगी भरण्यासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी या ठिकाणी चहापाणी विक्री करुन आपला उदरनिर्वाह चालवत होते .मात्र या परिसरात वन विभागाचे तिन कार्यालय आहेत.

त्यांनी या व्यवसायीकांना आपण आमचे जागेवर धंदा करु नये म्हणून वारंवार नोटीस बजावली तरी सुद्धा हे व्यवसाईक हण्यास तयार नव्हते व तेच न्यायालयात गेले परंतू न्यायालयाने त्यांचे म्हणणे न मानता वनविभागाच्या बाजूने मत दिले.त्याअर्थी वनविभाग मार्कंडा कंनसोबा व वन्यजीव अभयारण्य चौडमपल्ली यांनी आज पोलीस बंदोबस्त घेऊन अतिक्रमण हटविले.यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत मार्कंडा कं व वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव जी.एम. लांडगे चौडमपली व त्यांचे वनपाल,वनरक्षक, वनमजूर उपस्थित होते.
आष्टी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कुंदन गावळे पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले व कर्मचारी उपस्थित होते.
पोटाची भाकर हिरावल्याने दोन कुटुंबावर उपासमारीची पाळी ओढवली आहे .