विटा महाग ,लाभार्थ्यांचे बजेट कोलमडले

46

✒️श्री भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.29डिसेंबर):-तालुक्यात घरकूल योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांचे घराचे बांधकाम सुरू आहे आधीच बांधकामाकरीता वापरात येत असलेल्या विविध साहित्याचा दरात भरमसाठ वाढ झाली असतानाच आता विटाभटी मालकांनीही विटाचे दर वाढविलयाने ही दरवाढ घरकूल लाभार्थ्यांचे बजेट बिघडविणारी ठरत आहे. शासनाच्या पंतप्रधान घरकूल योजना.शबरी घरकूल योजना.रमाई घरकूल योजना.समाजकल्याण विभाग घरकूल योजनेअंतर्गत चामोर्शी तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आले आहे.

या लाभार्थ्यांना विशिष्ट मर्यादित घरकूल बांधकाम करण्याचे निर्देश सबंधीत विभागाद्वारे देण्यात आले आहे मात्र घरकूल बांधकामाकरीता वापरात येणाऱ्या साहित्यात दरवाढ झाली असल्याने लाभार्थ्यांना अडचणीचा सामणा करावा लागत आहे.

या मध्ये रेती.लोहा.सिमेंट.मुरूम.विटा. आदी साहित्याचा समावेश आहे. विटाची मागणी वाढल्याचा फायदा घेत विटाभटी मालकांची मनमर्जी सूरू झाली आहे विटाभटी मालक प्रती ट्रकटर 9 हजार रूपये दर आकारीत असल्याने लाभार्थ्यांना घरकूल बांधकामाकरीता अडचणी निर्माण होत आहे