कोरोना काळात जीवाची पर्वा न करता रुग्ण सेवा करणाऱ्या समाजसेवकाचा सन्मान करण्यात मला अभिमान वाटतो ; शेख बरकत अली

26

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.29डिसेंबर):-कोरोना महामारी च्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांसाठी मदतीचा हात उंचावणाऱ्या थोर समाजसेकांचा सन्मान करण्यात महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघ आणि मला स्वतःला अभिमान वाटतोय असे उदगार महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख यांनी येवला तालुक्यातील पाटोदा येथे कोरोना योद्धा सन्मानपत्र वाटप व राजनीति समाचार वेब पोर्टलचे उद्घाटन या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेख बरकत आली हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मालेगाव येथील मानव समाचार न्यूज चॅनेलचे संपादक अन्वर खान, सहसंपादक अब्दुल रहमान शेख, पाटोदा येथील ह.भ.प. चव्हाण महाराज, पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर महंमद, पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राज महंमद शेख, अहमदनगर जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया अध्यक्ष असलम बिनसाद, अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष राज मोहम्मद आर शेख, अहमदनगर उत्तर जिल्हा उपाध्यक्ष एजाज सय्यद, नाशिक जिल्हा सचिव वहाब खान, नासिक जिल्हा कार्याध्यक्ष मन्सूर भाई पठाण, निफाड तालुका अध्यक्ष असलम शेख ,लासलगाव शहराध्यक्ष निसार शेख, चांदवड तालुका अध्यक्ष सुखदेव केदारे, चांदवड शहर अध्यक्ष राहुल गायकवाड, येवला तालुका अध्यक्ष सूर्यकांत गोसावी, येवला शहर सचिव कालिदास अनावडे, पाटोदा येथील वैद्यकीय अधिकारी पाटोदा ग्रा. प .चे ग्रामसेवक पाटोदा येथील पोलीस पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चांदवड शहराध्यक्ष ॲड राहुल गायकवाड यांनी केले तर प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक व पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष उस्मान भाई शेख यांनी केले यावेळी कार्यक्रमात अंगणवाडी सेविका आशा सेविका आरोग्यसेविका यांच्यासमवेत ग्रामपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी तसेच कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पत्रकारांना कोरोना योद्धा हे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले याच बरोबर नाशिक जिल्ह्या करिता सुरू करण्यात येणारे राजनीति समाचार वेबपोर्टल चे उद्घाटन राजनीती समाचार चे संपादक शेख बरकत अली यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघ तसेच राजनीति समाचार वृत्तपत्र व वेबपोर्टल प्रतिनिधींची नियुक्ती करून त्यांना ओळखपत्र प्रदान करण्यात आले कार्यक्रमात ह-भ-प चव्हाण महाराज, उस्मानभाई शेख, मानव समाचार सहसंपादक अब्दुल रहमान शेख, पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष मन्सूर पठाण, चांदवड तालुका अध्यक्ष सुखदेव केदारे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले पुढे आपल्या अध्यक्षीय भाषणात शेख बरकत अली म्हणाले की मी 29 वर्षाचा झालो! अर्थात पत्रकार संघ म्हणतोय मी 29 वर्षांचा झालोय आणि 29 वर्षांचा प्रवास चांगले आणि वाईट प्रसंगांना सामोरे जाऊन आम्ही पूर्ण केला 29 वर्षांपूर्वी परिस्थिती अत्यंत वाईट होती.

प्रस्थापित पत्रकार नवोदित पत्रकारांना पत्रकार म्हणून सामावून घेत नव्हते बहुतेक पत्रकारांची त्यांना इर्षा वाटत होती त्यावेळी इच्छुक व नवीन पत्रकारांचे संघटन तयार करून आपण पत्रकार संघाची स्थापना केली होती या संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा पत्रकारांवर आलेल्या अडचणींना आपण सडेतोड उत्तर देऊन न्याय मिळवून देण्यात यशस्वी ठरलो अनेक वेळा विरोधात बातमी छापल्याचा रोष धरून पत्रकारांवर हल्ले करण्यात आले त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले तसेच मानहानीचे दावे करण्यात आले अशा वेळेस तो पत्रकार एकटा पडून त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होते अशावेळी कोणीही नातेवाईक मित्र वर्ग त्या पत्रकाराला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदत करण्यास तयार होत नाही अशा वेळी पत्रकार संघाने त्या पत्रकारांच्या पाठीशी उभे राहुन त्याला न्याय मिळवून दिलेला आहे पत्रकारांचा विकास व्हावा या उद्देशाने पत्रकार संघ महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाशी निवेदन व पत्रव्यवहार करीत आहे प्रत्येक तालुक्यातून पत्रकार वसाहत व्हावी अधिस्वीकृतीधारक पत्रिकारा प्रमाणेच आर एन आय ची नोंदणी झालेल्या वृत्तपत्राच्या पत्रकारांना सवलती देण्यात याव्यात पत्रकारांना मानधन व पेन्शन देण्यात यावी अशा अनेक मागण्या पत्रकार संघाने शासनाकडे केल्या असून गरज पडल्यास आपण पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र भर आंदोलन करणार असल्याचे शेख यांनी सांगितले.

यावेळी आपल्या भाषणात मानव समाचार चे सहसंपादक अब्दुल रहमान यांनी सांगितले की रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा असून अडचणीत सापडलेल्या रुग्णांना मदत करणे हे फार मोठे सत कार्य आहे पत्रकार संघाने रुग्ण सेवा करणाऱ्या समाजसेवकांचा कोरोना योद्धा हे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्याचे जे कार्य केले ते कौतुकास्पद आहे असे त्यांनी सांगितले कार्यक्रमास कालिदास अनावडे, दादाभाऊ मोरे, मुजम्मिल शेख, अंबादास पगारे, असलम शेख, रवींद्र केदारे, अनिस शेख, शाहिद पठाण यांच्यासह पत्रकार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार कार्यक्रमाचे संयोजक उस्मानभाई शेख यांनी मानले