चिमूर नगर परिषद च्या परिसरात अस्वच्छता , प्रशासनाचे दुर्लक्ष?

30

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.29डिसेंबर):-चिमूर नगर परिषद अंतर्गत* *क्षेत्रात स्वच्छता होत* *नसल्याने जनतेचे आरोग्य* *धोक्यात येण्याची* *शक्यता असल्याने नप प्रशासनाने दखल घेण्याची* *मागणी कांग्रेस शहर मीडिया* *प्रमुख पप्पूभाई शेख यांनी केली आहे.*

नगर परिषद ला मागील ऐक वर्षांपासून प्रशासन बसले तेव्हा पासून नगर परिषदचे कोणत्याही कामाकडे लक्ष नाही स्वच्छता आणि नाल्या सफाईची निविदा काढण्यात आली काही महिने ठेकेदारने कामे केली पण ठेकेदारने मजुरची मजुरी दिली नाही म्हणून मागील काही महिने महिन्यापासून नाल्या उपसा झाल्या नाही. त्यामुळे नालीतील पाणी प्रवाह वाहत नसल्याने पाणी साचून राहत असल्याने मच्छर वाढत आहे. रस्त्याची साफसफाई होत नसल्याने रस्त्याच्या कडेला कचरा ढिग पडून आहे. कचरा गाडी दोन,तिन दिवसानंतर योतो पण काही प्रभागात सातही दिवस येत नाही.

आणि सार्वजनिक विहीर, हेंण्ड पंप ( बोरिंग )ला सुद्धा ब्लिचिंग पावडर टाकत नसल्याचा प्रकार निदर्शनास येत असल्याने याकडे नगर परिषद प्रशासन चे दुर्लक्ष होत असल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.करिता नगर परिषद प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन सफाई ठेकेदारावर कार्यवाही करावीआणि नगर परिषद ने स्वच्छताकडे लक्ष देऊन पूर्णपणे कामे करावी असी मागणी चिमुर कांग्रेस शहर मीडिया प्रमुख पप्पूभाई शेख यांनी केली आहे.
अन्यथा सफाई कर माफ करण्यात यावे.