शिंदी बुद्रुक विकास सेवा सोसायटी नूतन पदाधिकारी निवडी उत्साहात संपन्न

77

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.29डिसेंबर):-माण तालुक्यातील शिंदी बुद्रुक विकास सेवा सोसायटी च्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर आज निवडून आलेल्या संचालकांमधून नूतन पदाधिकारी श्री. हिराजी सदाशिव इंगळे यांची चेअरमन तर श्री. केशव ईश्वर खरात यांची व्हाइस चेअरमन पदी एकमताने निवड करणेत आली. पदाधिकारी यांची निवड करणेकामी अध्यासी अधिकारी श्री. एस.बी. कांबळे यांचे अध्यक्षतेखाली सर्व नूतन संचालक यांची विशेष सभा विकास सेवा सोसायटी कार्यालयात आयोजित करणेत आली होती. नूतन संचालक हेमंत इंगळे,सौ. सुरेख इंगळे,सौ. रुपाली घोरपडे, धुळा कुंडले,नारायण इंगळे, शिवाजी इंगळे आदी उपस्तिथ होते.

नूतन पदाधिकारी यांचे सत्कार समारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस चे पॅनल प्रमुख श्री. मनोहर इंगळे साहेब राष्ट्रवादी माण तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत, श्री.लालासो ढवाण युवा नेते संग्राम पोळ ,नंदकुमार इंगळे साहेब ,धनाजी इंगळे सोसायटी सचिव शिंदे साहेब यांची विशेष उपस्तीथी होती. मान्यवरांनी नूतन पदाधिकारी व संचालक याना शुभेच्छा दिल्या. यावेळी नूतन चेअरमन व व्हाइस चेअरमन यांनी सर्वाना सोबत घेऊन आगामी काळात शिंदी बुद्रुक विकास सेवा सोसायटी चे माध्यमातून सर्व सामान्य शेतकरी वर्गासाठी विविध योजना राबवून आगामी काळात सोसायटी चे कामकाज अधिक लोकाभिमुख करणेसाठी कटिबद्ध असलेचे सांगितले यावेळी शशिकांत इंगळे, किरण इंगळे , संदीप खरात ( राजप ) सरपंच प्रशांत काळे , रत्नाकर इंगळे ,महावीर खरात संजय खरात व ग्रामस्थ उपस्तिथ होते.