घुग्घुस शहर काँग्रेच्या आंदोलनाला लागले गटबाजीचे ग्रहण

29

🔹आंदोलनास कार्यकर्त्यांची अत्यल्प उपस्थिती

🔸जेष्ठ नेत्यांनी फिरविली आंदोलनाकडे पाठ

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.30डिसेंबर):-गुरुवार 30 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता गांधी चौक पासून लॉयड्स मेटल कंपनी गेट पर्यंत घुग्घुस शहर काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या नेतृत्वात रोजगार व प्रदूषण विरोधात लॉयड्स मेटल कंपनी विरोधात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अत्यल्प उपस्थितीमुळे व वरिष्ठ नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे मोर्चा अपयशी ठरला.घुग्घुस शहर काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांनी समाज माध्यमातून या मोर्चात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. परंतु त्यांच्या आवाहनाकडे नागरिकांनी, काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी, किसान सेल आघाडीच्या नेत्यांनी, एससी सेल आघाडीच्या नेत्यांनी तसेच महिला शहर आघाडीच्या नेत्यांनी पाठ फिरविली व त्यांनी या मोर्चाला दांडी मारून आपली उपस्थिती दर्शविली नाही.

त्यामुळे या मोर्चाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची अत्यल्प उपस्थिती होती. काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे न ऐकता मोर्चा काढल्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी पाठ फिरवली अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.
गांधी चौक पासून मोर्चा लॉयड्स मेटल कंपनी कडे येत असतांना मोर्चातील सहभागी आंदोलनकर्त्यांनी असंविधानिक भाषेचा वापर करीत नारेबाजी केली.कंपनी गेट जवळ मोर्चा येताच लॉयड्स मेटल कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली व मागण्यांचे निवेदन देण्यात आले.त्यानंतर एका तासातच मोर्चा गुंडाळण्यात आला.