आ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते रस्त्यांच्या विकासकामाचे भूमिपूजन

30

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.30डिसेंबर):-मुख्यमंत्री ग्रामसडक योजना परभणी अंतर्गत गंगाखेड तालुक्यातील १) प्रजिमा २१ ते ब्रम्हणाथवाडी या २.८६० किमी रस्त्याच्या सुधार कामाकरिता १ कोटी ४५ लक्ष रुपये २) प्रजिमा २१ ते चिंचटाकळी या १.३०० किमी रस्त्याच्या सुधार कामाकरिता ८५ लक्ष रुपये या रस्त्यांच्या कामाची सुधारणा करण्याचा भूमिपूजन सोहळा गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते आज ३० डिसेंबर रोजी संपन्न झाला.

मौजे चिंचटाकळी व ब्रम्हणाथवाडी ता. गंगाखेड येथील नागरिकांची रस्त्या अभावी गेल्या अनेक वर्षापासून हेळसांड होत होती. या रस्त्याची सुधारणा करण्याची कामे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होती. आमदार गुट्टे यांच्या सततच्या प्रयत्नाने या दोन्ही रस्त्यांची सुधार कामे मंजूर झाली असून आज या कामाचा भूमिपूजन झाला त्यामुळे या परिसरातील सामान्य नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

याप्रसंगी जि.प. सदस्य किशनराव भोसले, राजेश फड, विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळुंके, गंगाखेड तालुका प्रभारी हनुमंत मुंडे, तालुका अध्यक्ष शिवाजी पवार, राजेभाऊ (बप्पा) कदम, प्रभाकर जाधव, सुधाकर मोरे, रामप्रभू मोरे, तुकाराम मोरे,अंकुश राठोड, बंडू चव्हाण सर यांच्यासह मौजे चिंचटाकळी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.