मांजरसुंभा येथील पोहीचा देव मंदिराला खडीक्रशरमुळे धोका;जिल्हाधिकारी, तहसिलदार, गौणखनिज आधिकारी यांना विश्वस्त भाविकांची तक्रार

39

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.31,डिसेंबर):-तालुक्यातील मौजे मांजरसुंभा येथे संस्थान पोहीचा देव श्री चक्रधर (श्रीदत्त मंदिर) देवस्थान असुन तिर्थक्षेत्रात समावेश असून त्या ठिकाणी राज्यातील, परराज्यातील महानुभवपंथी भाविक येतात. याठिकाणी अंदाजे २५ साधुंचे आश्रम असुन १०० भाविक वास्तव्यास करत असून साधना करतात, मात्र याठिकाणी नविन खडीक्रशर उभारले जात असून विश्वस्त मंडळाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही, जवळच नविन होऊ पाहत असलेल्या खडीक्रशर मुळे मंदिराला हादरे बसुन तडे जाऊ शकतात तसेच ध्यानसाधना करणा-या साधुसंताना साधनेत व्यत्यय येऊ शकतो, वयोवृद्ध भाविकांना धुळ, आदि प्रदुषणामुळे विविध आजारांना सामोरे जावे लागु शकते.

तसेच सध्या या ठिकणचा रस्ता हा मंदिराच्या जागेतुन जात असून जडवाहनाने रस्ता खराब होईल तसेच त्यामुळेच विश्वस्तमंडळ तसेच भाविकांनी या नविन खडीक्रशरला विरोध करत खडीक्रशरची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी अशी तक्रार जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक बीड, तहसिलदार, गौणखनिज खनिकर्म आधिकारी यांना दिली आहे. निवेदनावर पोहीचा देव विश्वस्त मंडळ अध्यक्ष विलास बडगे, सचिव श्रीकृष्ण सुर्यवंशी, पुजारी विश्वनाथ बीडकर, रंगनाथ गपाट, संदिप वीर, सावंत प्रकाश, रेखाबाई मानेकर, भाविक राजेभाऊ गिरे, गोवर्धन गिरे, सुदाम मुळे, अर्जुन गिरे, बाळासाहेब जाधव, रामकिसन गिरे, गणेश मोरे, जनार्दन वाणी, नितीन दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर आदिंच्या स्वाक्षरी आहेत.

मोरदरा अभयारण्यातील वन्यजीव प्राण्यांना धोका
___
मंदिरालगतच मोरदरा येथील राखीव अभयारण्य असून त्याठीकाणच्या वन्यप्रण्यांना या खडीक्रशरच्या आवाजामुळे तसेच प्रदुषणामुळे तात्र होऊन त्यांचाही जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो त्यामुळेच सदरील निर्माणाधीन खडीक्रशर मान्यता रद्द करण्याची मागणी होत आहे.