घाटनांदुर येथील बसस्थानक नुतनिकरनाच्या कामाला सुरुवात

32

🔹घाटनांदुर बसस्थानक गेले अनेक वर्षे पासून दूरआवस्थेत असल्याने प्रवाशांना हाल पेस्टा सहन कराव्या लागत आहेत

✒️राहुल कासारे(घाटनांदूर सर्कल प्रतिनिधी,अंबाजोगाई)मो:-97634 63407

घाटनांदुर(दि.31डिसेंबर):-अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर ही मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखले जाणारे घाटनांदुर हे गाव असुन, गेल्या अनेक वर्षांपासून बसस्थानकाची अत्यंत वाईट अवस्था झालेली होती. तेथे दारूडे, माथेफिरू, जुगारी इत्यादींचा अड्डा बनला होता. यामुळे प्रवास हे कधीच बसस्थानकाची पायरी चढत नव्हते. मागील अनेक वर्षांपासून प्रवाशांची गैरसोय होत असल्याने, अनेक वेळा वृत्तपत्रात बातमी द्वारे मागणी प्रशासनाला करण्यात आली होती. परंतु प्रशासनाने या कडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले. पण प्रदीर्घ कालावधीनंतर का होईना नुतनिकरनाच्या कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे प्रवासी सुखावले आहेत.

घाटनांदुर बसस्थानका पासून कांही अंतरावर रेल्वे स्टेशन आहे. बिड जिल्हात परळी नंतर घाटनांदुर हे एकमेव रेल्वे स्टेशन आहे. अगदी निजाम सरकार कालीन हे स्टेशन असून यास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. यामुळे प्रवाशांची वर्दळ ही खूप प्रमाणात असते. या भागातील २०-ते२५ खेड्या वाड्याचा या घाटनांदुर बाजारपेठ, बसस्थानक, रेल्वे स्टेशन शी संपर्क आहे. त्याच बरोबर अनेक विद्यार्थी याच गावातील शाळा महाविद्यालये यात शिक्षण घेत आहेत. हे शैक्षणिक द्रष्ट्या नावाजलेले गाव असुन, विद्यार्थी पास, कामगार प्रवासी पास, जेष्ठ नागरिक, महीला यांच्या अत्यंत सोयीचे व गरजेचे झाले आहे.

एकुणच या बसस्थानकाच्या नुतनिकरनाच्या कामामुळे प्रवाशांची होणाऱ्या गैरसोय, उन्हाळ्यात उन, पावसाळ्यात पाऊस, बसस्थानक असून नसल्यासारखे जाणवत होते. आत्ता प्रवासी व गावकरी हे सुखावले आहेत. तसेच याच बसस्थानक परिसरात प्रचंड प्रमाणात विविध प्रकारच्या झाडांची वाढ झाली असून तेही लवकरात लवकर तोडून घ्यायला हवी अशी मागणी प्रवासी करत असून सदरील बसस्थानकाचे काम दर्जेदार व मजबूत होणं ही काळाची गरज आहे व शासनाने दिलेला निधी प्रमाणिक पणाने या कामाला लावून बस्थस्थानकाचे काम लवकरात लवकर व्हावे अशी आशा जण-माणसातून व्यक्त होत आहे.या कामाची घाट नांदूर येथील एस टी कर्मचारी बाबासाहेब कांबळे प्रतिनिधी शी बोलताना माहिती दिली. असता सदरील कामावर रोहित गुर्जर, गोविंद गूर्जर, रामदास(बाळू) शिंदे, इत्यादी कामगार काम करत असल्याचे सांगितले.