नशाबंदी मंडळातर्फे नववर्ष धुंदीत नव्हे शुद्धीत साजरे करा अभियान

46

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.31डिसेंबर):-नशाबंदी मंडळ गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीने ‘ नववर्ष धुंदीत नव्हे शुद्धीत साजरे करा ‘ या अभियानाचे आयोजन नववर्षाच्या पूर्वसंध्येला करण्यात आले होते. गडचिरोली शहरातील मुख्य इंदिरा चौकात मंडळातर्फे जनजागृतीपर पोस्टर लावण्यात आले होते. सकाळी मंडळाच्या सदस्यांनी चौकात उपस्थिती दर्शवून उपस्थित युवा वर्गांना व्यसनमुक्तीचे पोस्टर तथा पाम्प्लेट वाटप करण्यात आले. दुपारच्या सत्रात शहरातील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये सदस्यांनी भेटी देऊन जनजागृतीपर पाम्प्लेट वाटप करण्यात आले.

तसेच व्यसन मुक्ती संकल्प सेल्फी पॉइंट तयार करून त्यावर विद्यार्थ्यांनी छायाचित्रे घेतली. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बोकारे आणि कुलसचिव डॉ. चिताडे यांनाही जनजागृतीपर पत्रक देण्यात आले.त्यांनीही या अभियानाचे कौतुक केले.

या संपूर्ण अभियान यशस्वी करण्यासाठी नशाबंदी मंडळाचे जिल्ह्यातील संघटक संदीप कटकुरवार ,अध्यक्ष उदय धकाते, पंडित पुडके , कुत्तरमारे गुरूजी तसेच शहरातील ज्येष्ठ साहित्यिक बंडोपंत बोढेकर आदी मान्यवरांनी सहकार्य केले .समाजामध्ये वाढणारी व्यसनाधीनता खूप भयानकरूप धारण करीत असल्याने , युवक वर्ग त्यात पूर्णतया व्यसनाच्या आहारी गेलेला आहे ,अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये शक्तिशाली , व्यसनमुक्त राष्ट्र घडवण्याचे दृष्टीने आपले सर्वांचे कर्तव्य समजून नववर्षाच्या सुरुवातीला नव संकल्प करून घेण्याच्या दृष्टीने सदर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन नशाबंदी मंडळ महाराष्ट्र गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले होते.