रसायन शास्त्र विभागातर्फे “प्रयोगशाळा आधारित प्रशिक्षण कार्यशाळेचे” आयोजन

31

✒️प्रदिप रघुते(प्रतिनिधी अमरावती)मो:-9049587193

अमरावती(दि.31डिसेंबर):-संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्नित,प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट द्वारा संचालित,विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथील रसायन शास्त्र विभागाद्वारे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 9.12.2021 रोजी करण्यात आले होते.कार्यशाळेचा विषय “LABORATORY BASED INDUCTION TRAINING ” हा होता.हि कार्यशाळा विज्ञान स्नातक भाग १ मध्ये नवीन प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.अलका अ. भिसे यांनी भूषविले तसेच प्रमुख अतिथी डॉ. प्रतिभा महल्ले , जीवशास्त्र विभागप्रमुख यांनी भूषविले.हि कार्यशाळा दोन सत्रामध्ये घेण्यात आली.पहिल्या सत्रात प्रा. निलेश पडोळे, विभागप्रमुख व सहाय्यक प्राध्यापक,रसायन शास्त्र विभाग यांनी GLASSWARE बद्दल माहिती दिली तसेच दुसऱ्या सत्रामध्ये डॉ.विनोद शेरेकर प्रा.रसायन शास्त्र विभाग यांनी CHEMICALS HAZARDS AND SAFETY यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना प्रयोग शाळेमध्ये वापरल्या जाणाऱ्या घातक रसायनाबद्दल माहिती देणे तसेच रसायन हाताळताना होणारे अपघात टाळणे हा होता . कार्यशाळेनंतर विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या शंकाचे निराकरण करण्यात आले तसेच त्यांच्या मागणीनुसार काही रसायनांचे प्रात्याक्षिक करून दाखवण्यात आले.या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन गौरव राठोड यांनी केले तर आभारप्रदर्शन चेतन वैद्य यांनी केले.