ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले जयंती निमित्त धरणगाव येथे आढावा बैठक….

34

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.31डिसेंबर):-येथील मोठा माळी वाडा मढी मध्ये आज रोजी सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. तत्पुर्वी संत सावता महाराज, तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले व सावित्रीमाईंच्या प्रतिमेस माल्यार्पण करून बैठकीस सुरुवात झाली.

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी शिक्षणाची खरी देवता सावित्रीमाई फुले यांचा जन्मोत्सव दिनांक ३ जानेवारी रोजी धरणगाव शहरात मोठ्या उत्सवाने साजरा करण्याचे ठरविले असून त्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी विविध विषयावर चर्चा झाली.

माळी समाजाध्यक्ष विठोबा नामदेव माळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले. तरी तालुक्यातील व शहरातील तमाम बांधवांनी ३ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ८ वाजता क्रांतिसूर्य राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाजवळ माल्यार्पण व अभिवादनसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष व पंचमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी अध्यक्ष विठोबा माळी, उपाध्यक्ष निंबाजी माळी, सचिव गोपाळ माळी, शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, पंच – सुखदेव महाजन, विजय महाजन, डिगंबर महाजन, रामकृष्ण माळी, पी.डी. पाटील सर, हेमंत माळी सर, रविंद्र वाघ, आबासाहेब राजेंद्र वाघ व धरणगाव शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.