जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष पदी सौ रूपालीताई पंदिलवार यांची नियुक्ती

59

🔹काँग्रेस पक्ष बळकट करून विकास कामांवर भर देणार – नवनियुक्त अध्यक्ष – रूपालीताई पंदिलवार

🔸आष्टी- ईल्लूर क्षेत्रातील जनतेकडून निवासस्थानी शुभेच्छाचा वर्षाव

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.1जानेवारी):-अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेटा डीसूजा व महाराष्ट्र प्रभारी ममता भुपेश यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस पदाधिकारी व जिल्हाध्यक्षाची पहिली यादी जाहीर केली असून गडचिरोली जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई पंदिलवार यांची नियुक्ती केली असल्याने यांचे निवासस्थानी आष्टी- ईल्लूर क्षेत्रातील जनतेकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

आपल्या खांद्यावर काँग्रेस पक्षाकडुन गडचिरोली जिल्ह्याचे अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याने गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष बळकट करून विकास कामांवर भर देणार असल्याचे सांगितले