गेवराईत वाळू माफियांना दणका; राक्षसभुवन, म्हाळसपिंपळगाव येथून सहा ट्रँक्टर, आठ केनीसह १ कोटींचा मुद्देमाल जप्त

29

🔺तहसीलदार सचिन खाडे यांच्या पथकाची कारवाई

✒️जिल्हा प्रतिनिधी,बीड(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.2जानेवारी):-गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांनी आज शुक्रवार रोजी अवैध वाळू उपसा व वाहतूकीविरोधात मोठी मोहीम राबविली. तालुक्यातील राक्षसभुवन तसेच म्हाळसपिंपळगाव ठिकाणी धाड टाकून सहा ट्रँक्टर, लोडर तसेच ८ केनीसह जवळपास १ कोटींचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.तहसीलदार सचिन खाडे हे मागील दहा-बारा दिवसांपासून मेडिकल रजेवर गेल्यानंतर वाळू माफियांनी गोदापात्रात नंगानाच सुरु केला होता. दिवसरात्र वाळू उपसा करुन ती वाहतूक केली जात होती.

यातच चार दिवसांपूर्वी राक्षसभुवन फाट्यावर वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील ट्रँक्टरने दुचाकीस्वाराला पाठीमागून धडक दिल्याने या घटनेत दुचाकीस्वार तुकाराम निंबाळकर (रा.खामगाव ता.गेवराई) यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटने नंतर ग्रामस्थांसह विविध पक्ष, संघटनेच्या पदाधिकारी यांनी उपजिल्हा रुग्णालयात ठिय्या मांडून ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे याठिकाणी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना येऊन आंदोलनकर्त्यांची समजून काढावी लागली होती. या घटनेनंतर तरी अवैध वाळू उपसा व वाहतूक बंद होईल असे वाटत होते. मात्र हि आशा निष्फळ ठरली, वाळू उपसा काही केल्या बंद झाला नाही