पहिल्या इतिहास पुनर्लेखन परिषदेचे थाटात उद्घाटन

31

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.3जानेवारी):-भारतीय इतिहास संशोधन परिषद नवी दिल्ली द्वारा अनुदानित,आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,अँड.बी.डी.हंबर्डे महाविद्यालय आष्टी.आयोजित अखिल भारतीय इतिहास संकलन योजना, दिल्ली संलग्नित इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांत पहिले राष्ट्रीय अधिवेशन,आधुनिक भारताच्या इतिहासाचे पुनर्लेखन  परिषदेचे उद्घाटन थाटात संपन्न झाले.संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे हे अध्यक्ष होते.डॉ.बालकुमार पांडे यांनी उद्घाटन केले.

डॉ.गो.ब.देगलुरकर,डॉ.एम.डी. जहागीरदार पाहुणे म्हणून उपस्थित होते.अमोल गरडकर यांनी स्वागत गीताने सुरुवात केली.रवींद्र पाटील यांनी महाराष्ट्र इतिहास गौरव गीत गायले.प्रास्ताविक डॉ.रवी सातभाई यांनी केले.डॉ.राधाकृष्ण जोशी यांनी इतिहास संकलन संस्था वाटचाल या विषयावर विचार मांडले.डॉ.भास्कर ब्राह्मनाथकर,डॉ.सर्जेराव ठोंबरे,दिलीप पाटील यांना विविध पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात आले.

प्रमुख पाहुणे डॉ.गो.ब.देगलूरकर यांनी बहुमोल विचार मांडले.डॉ.अरविंद जामखेडकर यांनी बीजभाषण केले.संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे यांनी अध्यक्षीय समारोप केला.यावेळी अतुल शेट मेहेर,दिलीप शेठ वर्धमान,प्रा.महेश चौरे,डॉ.सोपानराव निंबोरे,प्राचार्य डॉ.हरिदास विधाते आदी उपस्थित होते.उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अभय शिंदे,कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी केले.डॉ.सखाराम वांढरे यांनी आभार मानले.प्रा.डॉ.सुहास गोपने,प्रा.जे.एम.पठाण यांनी परिश्रम घेतले.