क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मोत्सव निमित्ताने त्रिरत्न अकॅडमी येथे प्रबोधन संपन्न

35

🔹सावित्रीबाई फुलेचां शिक्षणाचा वारसा आपल्या वैचारिक कृती तुन सिद्ध करा – सतिश शिंदे

✒️पी.डी.पाटील सर(विशेष प्रतिनिधी)

धरणगाव(दि.4जानेवारी):-स्त्र शिक्षणाच्या प्रणेत्या ,विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमीत्त आज त्रिरत्न अकॅडमी पिंप्री येथे प्रबोधन संपन्न झाले.सावित्रीबाई फुले जन्मोत्सव निमित्त आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी महिला मुक्ती दिवस व बालिका दिवस निमित्ताने भिडे वाड्या पासून सुरू झालेला शिक्षण संघर्ष व्यक्त करत सावित्रीबाई फुले एक संघर्ष गाथा कश्या होत ; हे अधोरेखित केले.

अकॅडमी चे संचालक सतिश शिंदे सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाचा आपण सुयोग्य वापर करत सामाजिक कार्य व सर्व समाज बांधव यांना सोबत घेत आपण विचार मजबुत करून सलोखा निर्माण करू शकतो यावर प्रकाशझोत टाकला. महानायिकांचे कार्य हे आपल्याला ऊर्जा देते त्या ऊर्जेची ऊब ही आपल्याला कठीण काळात संघर्ष निर्माण करण्याची ताकद देते. महिला मुक्ती दिनानिमित्त आपण आपल्या स्वातंत्र्य चा पुरेपूर वापर करत नवा आदर्श निर्माण करावा असे प्रतिपादन केले.

कोविड 19 नियम पालन करत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सूत्रसंचालन माहेश्वरी बडगुजर तर आभार रोहन भालेराव यांनी केले.