भाजपाचे जेष्ठ नेते निरंजन डंभारे यांची घरवापसी

33

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

🔸मनातून भाजपाशी जुडलेले होते म्हणून घरवापसी- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे मनोगत

घुग्घुस(दि.4जानेवारी):-शनिवार 1 जानेवारी रोजी घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपाचे जेष्ठ नेते निरंजन डंभारे यांनी घरवापसी करीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला.

अवघ्या काही महिन्यापूर्वी निरंजन डंभारे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला होता परंतु नवीन वर्षात त्यांनी घरवापसी करीत भाजपात प्रवेश घेतला आहे याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी निरंजन डंभारे यांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून भाजपात स्वागत केले.

याप्रसंगी बोलतांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले नवीन वर्षाच्या शुभ पर्वावर भाजपाचे जेष्ठ नेते निरंजन डंभारे यांच्या भाजपात पुनर्प्रवेश होत आहे. अनेक वर्षांपासून ते भाजपाचे नेते म्हणून काम करत होते. अवघ्या काही महिन्यापूर्वी ते काँग्रेस मध्ये गेले होते. परंतु काँग्रेस मध्ये त्यांचे मन रमले नाही ते शरीराने काँग्रेस मध्ये गेले होते मनाने नाही. भाजपाचे संस्कार व एक परिवार समजून कार्यकर्ते काम करतात त्यामुळे भाजपाचे जेष्ठ नेते निरंजन डंभारे हे भाजपाशी जुडून होतेच भाजपात मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो.

यावेळी माजी सरपंच संतोष नुने, भाजपाचे सुरेंद्र भोंगळे, धनराज पारखी, राजू भोंगळे, मधुकर धांडे, सुशील डांगे, अमोल तुलसे व कार्यकर्ते उपस्थित होते.