रस्त्यावरील बेशिस्त अस्थापने सिरसाळा पोलीस प्रशासनाने हटवली

32

🔸डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकाने घेतला मोकळा श्वास ,एपीआय एकशिंगे यांची डॅशिंग कामगिरी

✒️सिरसाळा प्रतिनिधी(अतुल बडे)

सिरसाळा(दि.7जानेवारी):-येथील डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील परळी-बीड, मोहा-पोहनेर रोडवर बेशिस्त पणे अनेक व्यावसायिकांनी मांडलेली आस्थापने सिरसाळा पोलीस प्रशासने हटवली आहेत. हि डॅशिंग कार्यवाही सिरसाळा पोलीस स्टेशन चे सह पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे व त्यांच्या सहका-यांनी केली आहे. बेशिस्त अस्थापने हटवल्याने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकाने मोकळा श्वास घेतला आहे.

अनेक व्यावसायिकांनी आपली छोठी मोठी अस्थापने थेट रस्त्यावरच चौकात चहू बाजूंनी मांडत असल्या मुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असे परिणामी अपघात घडत असत, एकाच आठवड्यात ह्याच ठिकाणी तीन ते चार अपघात झाले, अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, वाहतूक कोंडी मुळे पार्थ वानरे ह्या शालेय विद्यार्थाला आपले प्राण गमवावे लागले. खूप गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. अपघातास कारण केवळ चौकातील बेशिस्त अस्थापना मुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडी आहे. याचे गांभीर्य लक्षात घेता सह पोलीस निरीक्षक प्रदिप एकशिंगे व सहकारी टिम ने वार गुरुवार रोजी बेशिस्त अस्थापना व्यावसायिकांना सक्त ताकीद देऊन दुकाने हटवण्यास सांगीतली. आज परिस्थितीत चौक सुटसुटीत दिसत आहे. जागा मोकळी झाल्याने वाहतूक कोंडी होत नाही. या ठिकाणी सिरसाळा पोलीस सतत उपस्थित राहत वाहतूक वेवस्था पाहत आहेत.

● रस्त्यावर बसणारा आठवडी बाजार ही हटवला
: आठवडी बाजार दिवशी पोहनेर रोड वर अनेक व्यावसायिक आपली दुकाने थाटून बसत होती. या मुळे भयानक वाहतूक कोंडी निर्माण होत होती. ऊस वाहतूकीचे वाहने येथूनच जात असल्याने भितीदायक परिस्थितीत होती.सिरसाळा पोलीसांनी येथील प्रश्न देखील मार्गी लावला. या मुळे ऊस वाहतूक व अन्य अवजड वाहतुकी सुरळीत सुरु होत्या. परिस्थितीत पहिल्या सारखीच राहिली असती तर एका दिवशी अनेकांना आपला जिव गमवण्याची वेळ आली असती.

● एपीआय एकशिंगे यांचाच दिवसभर बोलबाला : गेल्या महिण्या भरापासुन बेशिस्त वाहतूक व बेशिस्त अस्थापना मुळे निर्माण होत असलेल्या कोंडीला सिरसाळ्यातला नागरिक त्रस्त होता. हा प्रश्न डाॅ.आंबेडकर चौक व पोहनेर रोड च्या बाजाराचा होता. सह पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी आज रस्त्यावर उतरुन दोन्ही ठिकाण चे प्रश्न मार्गी लावले.या मुळे सिरसाळ्यात एपिआय एकशिंगे यांचाच बोलबाला होत असुन सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.