रुग्णांना फळ वाटप करून उमरखेड येथे पत्रकार दिन साजरा

25

🔹प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचा उपक्रम

✒️अमोल उत्तम जोगदंडे(तालुका प्रतिनिधी)

उमरखेड(दि.7जानेवारी):- उमरखेड येथील शासकीय विश्रामगृह येथे दि.६ जानेवारी २०२२ रोजी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ उमरखेड यांच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेची सुरुवात करणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्र दर्पण नियतकालिके सुरू केले होते. त्याचं स्मरण म्हणून आपण ६ जानेवारी रोजी महाराष्ट्रात पत्रकार दिन किंवा दर्पण दिन साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर उमरखेड येथील शासकीय विश्रामगृहावर
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले, त्यानंतर शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळ, बिस्कीट व पाणी बॉटल वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा अध्यक्ष अनिल राठोड, राज्य उपाध्यक्ष सविता चन्द्रे, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना भोपळे, जिल्हा युवा अध्यक्ष मारोती गव्हाळे,उमरखेड तालुका अध्यक्ष हरिदास इंगोलकर,
उपाध्यक्ष संदेश कांबळे, सचिव मैनोद्दीन सौदागर, शेख नयूम शेख मोईद्दीन, भागवत काळे, सुनील ठाकरे सविता घुगरे, विवेक जळके, मारोती रावते, इत्यादी उपस्थित होते यावेळी पुरोगामी संदेश या साप्ताहिक वृत्तपत्राचे पत्रकार अमोल जोगदंडे यांना संघटनेचे सदस्यत्व देण्यात आले.