लिटिल फ्लावर स्कूल ब्रह्मपुरी येथे जापनीज इन्सेफेलायटीज (मेंदूज्वर) लसीकरण मोहिम संपन्न

34

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.10जानेवारी):-जापनीज इन्सेफेलायटीज (मेंदूज्वर) या रोगामुळे दरवर्षी अनेक बालकांचा मृत्यू होतो कोवळी बालके या आजाराला बळी पडतात त्याची दखल घेऊन बालकांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेअंतर्गत ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी द्वारे लिटिल फ्लॉवर स्कूल ब्रह्मपुरी येथे जापनीज इन्सेफेलायटीज लसीकरण मोहिमेचे आयोजन दिनांक 10 जानेवारी 2022 रोज बुधवार ला केले होते.

यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. सदर मोहीम एन. एस. दडमल आरोग्य सहायक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. सोबत आरोग्य सहायिका वाघ मॅडम ,डी. डी. राऊत सेवक, शाळेच्या प्राचार्य एकता गुप्ता मॅडम ,ज्योती दरवरे मॅडम, लक्ष्‍मण मेश्राम , सोनाली ठाकरे ,देव ठाकरे ,विवेक खरवडे हे उपस्थित होते.