ठाकर आडगांव येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती शासनाच्या नियमाप्रमाणे साजरी

31

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.12जानेवारी):-ठाकर आडगांव येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कोरोनाच्या नियमाप्रमाणे राजमाता ,स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब यांची जयंती साजरी केली.माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते, याचे सर्वात मोठे उदाहरण जिजाबाई यांचे असावे. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला.

तसेच त्यादृष्टीने बालपणापासूनच त्यांना तयार केले. शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन, व्यवस्थापन, मुत्सद्देगिरी, शस्त्रविद्या व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती निमित्त त्यांच्या फोटोला दिलीपराव सम्राट यांनी पुष्पहार वाहुन आरती केली यावेळी मार्गदर्शन केले.

कोरोनाचे नियम सर्वांनी पाळावे व मास,अशा वेगवेगळ्य़ा साहित्याचे आपण वापर केला पाहीजे आणी या निमित्त सर्वांना वृक्ष लागवडीसाठी वृक्ष हे शिवजयंतीला १०० वृक्ष देणार आहेत . यावेळी अहिलाजी कोकाट,शिवाजीराव कोकाट,विश्वांभरराव चव्हाण, भानुदासराव कोकाट,अच्युतराव चव्हाण,रामभाऊ आनंदे,ज्ञानोबा जाधव,राधाकिसनराव चव्हाण,नारायणराव कोकाट, समाधान सम्राट,ऋषीकेश कदम ,वैभव कदम,विलास चव्हाण,रोहण चव्हाण,करण चव्हाण, दत्ताभाऊ चव्हाण, अशोक चव्हाण, लहु नाना कोकाट,अविनाश जाधव,गोकुळ खरात,गोकुळ कोकाट,विकास कदम, शिवम कदम व सर्व मान्यवर उपस्थित होते …!