नकोडा येथे ड्रोन सर्वेक्षण

33

🔹सर्वांना हक्काचे पट्टे मिळणार- श्री. किरण बांदूरकर सरपंच नकोडा

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.13जानेवारी):-गुरुवार 13 जानेवारी रोजी दुपारी दरम्यान घुग्घुस येथून जवळच असलेल्या नकोडा गावात स्वामीत्व योजने अंतर्गत सर्वे ऑफ इंडियाच्या चमुने गावठाण सर्वेक्षण केले.
यावेळी बोलतांना चंद्रपूर भूमी अभिलेख उपअधीक्षक मिलिंद राऊत म्हणाले या सर्वेक्षणाने सर्वांना मिळकत पत्रिका, प्रॉपर्टी कार्ड, नकाशे तयार करून मिळणार आहे.नकोडा सरपंच किरण बांदूरकर म्हणाले केंद्र सरकारच्या सर्वेच्या माध्यमातून सर्वांना आखीव पत्रिका, हक्काचे जमिनीचे पट्टे, सातबारा मिळणार आहे.

त्यामुळे मी केंद्र सरकारचे आभार मानतो.यावेळी भुमरेड्डी गिजेवार मुख्यालय सहाय्यक भूमी अभिलेख चंद्रपूर, बी.बी. रामटेके सर्वेअर, मनोज भांदककर, रवी सिंग, हितेश नतवानी, नकोडा उपसरपंच मंगेश राजगडकर, सदस्य सौ. तनुश्री बांदूरकर, माजी सरपंच ऋषी कोवे, ममता मोरे, विठ्ठल तुराणकर, सोनाली येंगलवार, अरुणा पटेल, जसबीर कौर, सुजाता गिद्दे, हेमा ताला, ग्रा.वि.अ. भानोसे, शंकर वासेकर, गणेश मेंढे, कृष्णकांत खानझोडे माहिती शिक्षण संवाद तज्ञ जिप चंद्रपूर उपस्थित होते.