काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची जिवती नगर पंचायतवर एक हाती सत्ता

32

🔹भाजपा- शिवसेनाचा सुपडा साफ

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.19जानेवारी):- नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. आमदार सुभाष धोटे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलाश राठोड यांनी आपली सत्ता राखली आहे. जिवती नगर पंचायत मध्ये काँग्रेसने ६ जागा व राष्ट्रवादी काँग्रेसने ६ जागांवर आपला विजय मिळवला आहे. तर गोंडवाना गणतंत्र पार्टीला फक्त ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

जिवती नगरपंचायतीमध्ये एकूण १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यातील १२ जागा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात आल्या आहेत. गोंडवाना गणतंत्र पार्टीला ५ जागा मिळाल्या असून भाजपा- शिवसेना सुपडा साफ झाला आहे. दरम्यान, मागील पंचवार्षिक वेळी जिवती नगर पंचायत मध्ये पहिले अडीच वर्षे काँग्रेसची एकहाती सत्ता होती तर नंतरची अडीच वर्षे भाजपाची म्हणजे माजी आमदार संजय धोटे यांची सत्ता होती. तरी पण आता भाजपाला खाते उघडता आले नाही ही चिंतनाची बाब आहे. यावेळी महाविकास आघाडी सरकार मधील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे पुन्हा एकदा एकहाती सत्ता आली आहे. तरी सर्व निवडून आलेल्या नगरसेवक, नगरसेविका व कार्यकर्त्या मध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.