मत्स्यशेती ठरले उपजीविकेचे साधन आष्ठा येथील वाल्मिकी मत्स्य संस्थेचा उपक्रम

81

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.19जानेवारी):-चंद्रपूर-भद्रावती पंचायत समितीच्या लिलावातून बिजोणी गाव तलाव भाडे तत्वावर घेणाऱ्या आष्ठा येथील वाल्मिकी मत्स्य सहकारी संस्थेने मत्स्य व्यवसायाला नवी सुरुवात करीत उपजीविकेचा मार्ग शोधला आहे.वाल्मिकी मत्स्य सहकारी संस्था आष्टा यांनी जुलै महिन्यात सदर तलाव भाडे तत्वावर लिलावातून घेतले. जुलै मध्ये 1 लक्ष 94 हजार मत्स्य बीज तलावात सोडण्यात आले. आता मासे मोठे झाले असून नुकतेच दीड क्विंटल मासे पकडण्यात येऊन प्रति किलो दीडशे रुपये प्रमाणे विकण्यात आले.

यातून आलेले 22500 रुपये संस्थेचे सचिव मारोती भोयर यांचेकडे सुपूर्द करण्यात येऊन संस्थेच्या खात्यात नोंदविण्यात आले.यामुळे सदस्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून आता हंगामात मासे मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊन नफा वाढणार आहे.संस्थेच्या सर्व सदस्यांना यातून फायदा होणार असून त्यांच्या उपजीविकेचा नवा मार्ग गवसला आहे.संस्थेचे अध्यक्ष आनंदराव मेश्राम यांनी यापुढे मत्स्य बीज तयार करण्याचा संकल्प केला आणि गरीब,वंचित व दुर्लक्षित कुटूंबाना संस्थेत सहभागी करून घेण्याचा मानस व्यक्त केला आहे.