भ्रष्टाचार विरोधी पुरस्कार सोहळ्यास मोठया संख्येने उपस्थित रहावे–विवेक कुचेकर

30

🔸एसीबीच्या 23फिर्यादीना पुरस्कार जाहीर

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.24जानेवारी):-जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हयात मागील 24 वर्षापासून भ्रष्टाचार विरोधी जन जागृती अभियान कार्यक्रम चालु असुन त्याचाच एक भाग म्हणून भ्रष्टाचार विरोधी सहकार्य करणारया फिर्यादीचा सत्कार ठेवण्यात येतो.मागिल वर्षात बीड जिल्हा प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी, कर्मचारयाचां निषेध , एसीबी ऑफिसकडे थेट लढ्ढा करून त्याना धडा शिकवणारे बीड जिल्हयातील 23 शुर फिर्यादी असुन त्याना भ्रष्टाचार जनजागृती अभियान बीड जिल्हा मार्फत भ्रष्टाचार विरोधी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

असुन या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून किसन बाबुराव सावंत(जेष्ठ मार्गदर्शक भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन ,बीड), कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड,अजित एम,देशमुख, (राज्य समिती सदस्य भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन महाराष्ट्र) प्रमुख उपस्थिती राजकुमार घायाळ(कामगार नेते)भारत राऊत (पोलीस उपाध्यक्ष एसीबी बीड ), कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तथा भ्रष्टाचार विरोधी जन जागृती अभियान संस्थापक अध्यक्ष नवनाथजी नाईकवाडे इत्यादी राहणार असुन हा पुरस्कार वितरण सोहळा दि 26 जानेवारी रोजी दुपारी 01 वाजता सर्वेश्वर गणपती मंदीर,जालना रोड बीड याठिकाणी होणार असुन तरी सर्व भ्रष्टाचार विरोधी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भ्रष्टाचार विरोधी जन जागृती अभियान बीड तालुका सदस्य विवेक कुचेकर यानी केले आहे