मृतक गौरव गुगलमाने यांचा अपघात नसून हत्याच

31

🔺पोलिस प्रशासन जाणीव पूर्वक करिता आहे दिरंगाई

🔺पोलिस आयुक्त अमरावती शहर यांच्या मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन..

✒️अमरावती प्रतिनिधी(मोहित राऊत)

अमरावती(दि.24जानेवारी):- पोलीस आयुक्त यांच्या अंतर्गत येणारे वलगाव पोलीस स्टेशन मधील शिराळा पुसदा या गावातील दिनांक 31 डिसेंबर 2022 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास गौरव गुगलमाने या युवकाचा अपघातास स्वरूप मर्डर करून त्याला अपघात दाखविण्याची षडयंत्र आरोपीकडून तथा पोलीस प्रशासनाच्या मदतीने होत असल्याचा आरोप घेऊन मृतकाचे नातेवाईक तथा आई-वडील तथा मातंग अस्मिता संघर्ष सेना जिल्हाध्यक्ष राजू कलाने यांच्या नेतृत्वात विविध आंबेडकरी चळवळीच्या संघटनांचे ज्येष्ठ नेते यांनी दिनांक 24 जानेवारी 2022 रोजी पोलीस आयुक्त अमरावती शहर यांना सदर प्रकरणी तात्काळ चंदन विजय लसनकार वय 26 वर्ष रा. शिराळा या आरोपीला अटक करून भादवि कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करून तुरुंगात रवानगी करण्याकरिता सदर निवेदनाद्वारे विनंती केली तसेच सदर निवेदनावर तात्काळ कारवाई न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातंग अस्मिता संघर्ष सेनेच्यावतीने विद्रोही आंदोलन करण्यात येण्याची माहिती सदर निवेदनाद्वारे देण्यात आली.

निवेदन देतेवेळी डॉक्टर रुपेश खडसे विदर्भ अध्यक्ष लहुजी शक्ती सेना, पंकज जाधव जिल्हाध्यक्ष लहुजी शक्ती सेना अमरावती, महाराष्ट्र प्रदीप महाजन सरचिटणीस भारतीय दलित पॅंथर महाराष्ट्र राज्य, सुरेश मेश्राम माजी नगरसेवक मनपा अमरावती ,संजय मोहोळ सामाजिक कार्यकर्ता अमरावती, निलेश अंभोरे मृतकाचे मामा, प्रदीप गूगलमाने मृतकाचे वडील ,संतोष सरकटे ,प्रमोद राऊत, गोवर्धन निघोट हत्येचा साक्षीदार, भाई रवींद्रकुमार इंगळे सामाजिक कार्यकर्ता अमरावती रामेश्वर रामटेके सामाजिक कार्यकर्ता अमरावती, मोहित राऊत प्रसिद्धीप्रमुख मातंग अस्मिता संघर्ष सेना अमरावती, बाळू कलाने मातंग अस्मिता संघर्ष सेना सदस्य, निलेश अंभोरे अमरावती शहर अध्यक्ष मातंग अस्मिता संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य,मृतकाचे आई व मावशी तसेच मोठ्या संख्येने मातंग अस्मिता संघर्ष सेनेचे कार्यकर्ते निवेदन देतेवेळी या ठिकाणी पोलीस आयुक्त कार्यालय समोर उपस्थित होते.