व्रद्ध सेवा निवृत्त सफाई महिला कामगार यांचे आमरण उपोषण

30

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.25जानेवारी):-येथील सेवा निवृत्त सफाई महिला कामगार यांना सेवा उत्पादन व रजा रोखीकरण पेन्शन एरीयस मिळवण्यासाठी गंगाखेड नगर परिषद प्रशासनाने आणली उपोषणाची वेळ गंगाखेड नगर परिषद येथील महिला सफाई कामगार जनाबाई गणपती साबळे या दिनांक01/01/2020 रोजी सेवा निवृत्त झाल्या असून नगर परिषद प्रशासन यांना वारंवार विनंती करून सुद्धा सेवा उत्पादन व रजा रोखीकरण पेन्शन एरीयस अदा न केल्या मुळे महिला सफाई कामगार जनाबाई गणपती साबळे यांना अखेर जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यथे दिनांक 25/01/2022 रोजी आमरण उपोषणास प्रारंभ केला असून अनेक सफाई कामगार व इतर सेवा निवृत्त कर्मचारी उपोषणास बसण्याची चर्चा करताना दिसतात.