प्रजासत्ताक दिनानिमित्त जिजाऊ अन्नपूर्णा योजनेचा शुभारंभ….

36

🔸पाटील समाज पंच मंडळाच्या वतीने योजना राबविणार…

✒️पी.डी. पाटील सर(विशेष प्रतिनिधी)

धरणगाव(दि.27जानेवारी):— येथील समस्त पाटील समाज पंच मंडळाचे माजी अध्यक्ष कै. सुकदेवअण्णा पाटील यांच्या स्मरणार्थ आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘जिजाऊ अन्नपूर्णा योजनेचा’ शुभारंभ करण्यात आला, समाजाच्या वतीने ही योजना राबविली जाणार आहे.कार्यक्रमाच्या सुरवातीला जगद्गुरू तुकोबाराय, माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. तद्नंतर समस्त पाटील समाज पंच मंडळाचे माजी अध्यक्ष कै. सुकदेव काशिराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलांनी ‘जिजाऊ अन्नपूर्णा योजनेसाठी’ रुपये ५१,००० दिलेत. दिलेल्या रकमेच्या मिळकतीतून ही योजना कार्यान्वित राहील.

या योजनेचा मूळ उद्देश असा की, जेव्हा कोणाच्या घरी काही दुःखद घटना घडते तेव्हा त्या घरातील व्यक्ती त्या दुःखात असतात. अशा वेळी अंत्यसंस्कार करून घरी परतल्यावर आलेले पाहुणे मंडळी, नातेवाईक व घरातील सदस्य यांच्या जेवणाची बऱ्याचदा गैरसोय होते. काही लोकांना जिथे मृत्यू झालेला असतो तेथील पदार्थ सेवन करणे वर्ज्य असते. या सर्व बाबींचा विचार करून येथून पूढे समाजातील कोणत्याही घरी काही दुःखद प्रसंग उद्भवल्यास ‘जिजाऊ अन्नपूर्णा योजनेच्या’ माध्यमातून घटनास्थळी समाजाच्या वतीने भोजन पोहच केले जाईल, जेणेकरून कोणाचीही गैरसोय होणार नाही. तसेच समाजाच्या वतीने ही योजना राबविली जाणार असल्यामुळे कोणालाही ते वर्ज्य नसेल.

कै. सुकदेव काशिराम पाटील यांच्या स्मरणार्थ रुपये ५१,००० सुपूर्द करतांना अण्णांचे सुपुत्र अशोक (आप्पा) पाटील, किशोर (बालू) पाटील व हेमंत (विठा) पाटील तसेच या रकमेचा स्विकार करतांना लहान माळी वाडा परिसरातील समस्त पाटील समाज पंच मंडळाचे अध्यक्ष भिमराज पाटील, उपाध्यक्ष दिलीपबापू पाटील, सचिव महेश्वर पाटील, खजिनदार लक्ष्मण पाटील, जेष्ठ संचालक माधवराव पाटील, कैलास पाटील, राजेंद्र पाटील, किशोर पाटील, गणेश पाटील, परशुराम पाटील, आनंद पाटील तसेच शिपाई अशोक झुंजारराव यांच्यासह जेष्ट सदस्य भगवान पाटील, मधुकर पाटील, शरद पाटील, सुका पाटील, पंकज पाटील, दिपक पाटील, राहुल पाटील, समाधान पाटील, गोपाल पाटील, दादू पाटील आदी समाज बांधव उपस्थित होते.