ने. हि. महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन सोहळा संपन्न

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.27जानेवारी):-ने. हि. महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. एच. गहाणे, शांताबाई भैया महिला, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. कानफाडे मॅडम, कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालक मेजर विनोद नरड सर, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. एस. एम. शेकोकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. आनंद भोयर, डॉ. मोहन वाडेकर, लेफ्टन्ट डॉ. के. एम. शर्मा, लेफ्टन्ट अभिजित परकरवार, ठाकरे मॅडम प्रामुख्याने उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व संचालन डॉ. एस एम. शेंकोकर शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख यांनी केले.डॉ एन. एस. कोकोडे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व या दिनाचे महत्त्व पटवून दिले. 20 महाराष्ट्र बाॅय बटालियन,3 महाराष्ट्र गल्स बटालियन च्या कॅडेटनी राष्ट्रध्वजला मानवंदना दिली. या कार्यक्रमा नंतर एन सी सी व एन एस एसच्या विद्यार्थांनी उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशास्त्रीपत्र व मेडल प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता डॉ.के.एम.शर्मा. श्री. संजू मेश्राम, श्री.मिथुन चौधरी, श्री.विकास पाटील यांनी परिश्रम घेतले.