शैक्षणिक दायित्त्व जोपासणारे बामणी गाव- शाळेला दिला स्मार्ट टी. व्ही. संच

45

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.27जानेवारी):-मुख्य कार्यकारी अधिकारी, जि प चंद्रपूर यांच्या प्रेरणेने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मिशन गरुडझेप हा उपक्रम सर्व गावात सुरू आहे या उपक्रमांतर्गत कोविड काळात इ 1 ते 5 च्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी भरून काढण्यासाठी शिक्षणदान उपक्रम तर कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय,शिष्यवृत्ती, सैनिकी शाळा,MMNS, NTS इ स्पर्धा परीक्षा करिता तयारी करवून घेणे, गावपातळीवर स्पर्धा परीक्षा वाचनालय तयार करणे त्याचा लाभ ग्रामीण विद्यार्थ्यांना व युवकांना होईल या दृष्टीने कार्यवाही सुरू झालेली आहे.

एक महिन्याअगोदर केंद्रप्रमुख यांनी जि प उ प्राथमिक शाळा बामणी पं स चिमूर येथे भेट दिली असता विद्यार्थ्यांना मिशन गरुडझेप अंतर्गत जिल्हा स्तरावरून येणारे शिष्यवृत्ती परीक्षा व इतर व्हीडिओ पाहण्यासाठी सदरहू शाळेमध्ये स्मार्ट टीव्ही ची व्यवस्था नाही ही निकड जाणवली व सदर समस्या गावातील शिक्षणप्रेमी श्री संजय दुधनकर यांना केंद्र प्रमुख यांनी सांगितली.लगेच श्री संजय दुधनकर, श्री मंगेश मोहोड सहा पोलीस निरीक्षक,श्री सुधाकर जांगडे सर,श्री विनोद खोडके सर,श्री निशांत अमदुरे, श्री सचिन राऊत ,श्री धनपाल खोडके व मित्रपरिवार यांनी त्वरित रुपये 20,000/- गोळा करून शाळेला स्मार्ट टीव्ही प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर भेट दिला.
बामणी गावच्या शैक्षणिक दायित्व जोपासणाऱ्या ह्या युवकांचे शिक्षण विभागाने मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

ह्या मित्र परिवाराची विशेष अभिनंदनीय बाब अशी आहे की गावामध्ये विद्यार्थी व युवकांना स्पर्धा परिक्षेकरिता एक अभ्यासिका तयार करण्याचा मानस व्यक्त केला सदरची अभ्यासिका नगर परिषद चिमूर व ग्रामस्थ बामणी यांच्या पुढाकारातून पूर्णत्वास नेण्याचा मानस बामणीवासीय ग्रामस्थ,शा व्य स ,मु अ व स शिक्षक व मित्रमंडळी यांनी व्यक्त केला आहे. 26 जानेवारीच्या शुभंपर्वावर श्री मंगेश मोहोड सहा पोलीस निरीक्षक,श्री संजय दूधनकर ,श्री टी आर महल्ले केंद्रप्रमुख चिमूर शा. व्य.स.व ग्रामस्थ यांच्या उपस्थितित टीव्ही शाळार्पण सोहळा सम्पन्न झाला श्री ना रा कांबळे मुख्यध्यापक जि प उ प्राथ शाळा बामणी यांनी मिशन गरुडझेप उपक्रम यशस्वी करण्याकरिता वचनबद्ध असल्याचे सांगून उपस्थित मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रमाचे संचालन श्री नथुजी रामटेके विषय शिक्षक सुपर 20 यांनी केले