दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन नको ऑनलाईन घ्या

29

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.1फेब्रुवारी):-कोरोनाचा संसर्ग अजूनही पुर्णत: कमी झालेला नाही. आतापर्यंतची शिक्षण प्रणाली ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आली असून दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाईनच घेण्यात याव्यात या मागणीसाठी पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.राज्य सरकारने यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.

परीक्षा नेमकी कधी घेण्यात येणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.शिक्षण विभागाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्या या मागणीसाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.सदरील मोर्चा राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष सुलेमान खान यांनी काढला होता. या वेळी अनेकांची उपस्थिती होती. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.