गोंगपाचे नवनिर्वाचित नगरसेवकांचा डॉ. मोतिरावेन कंगाली यांच्या समाधी स्थळी सत्कार

33

🔸गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या प्रदेश कमेटीचे आयोजन

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.3जानेवारी):- येथील नगरपंचायतीची निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली, त्यात गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांच्या नेतृत्वात गोंडवाना गणतंत्र पार्टीने निवडणूक लढवली व 5 नगरसेवक निवडणुन आले. त्यात सतलूबाई गोदरु पाटील जुमनाके, ममताजी जाधव, जमालुद्दीन शेख, लक्ष्मीबाई जुमनाके, क्रिष्णा सिडाम या नगरसेवकांचा सत्कार डॉ. मोतिरावेन कंगाली यांच्या दुलारा या समाधीस्थळी आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हरीशजी उईके, प्रदेश उपाध्यक्ष सुखलाल मडावी, प्रदेश महासचिव अब्दुल जमीर, प्रदेश प्रवक्ते महेबूब शेख, गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेशजी इरपाते, युवा मोर्चा प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी, जिल्हाउपाध्यक्ष निशिकांत सोनकांबळे, राजुरा विधानसभा कोर कमेटी अध्यक्ष पांडुरंगजी जाधव, जिवतीचे माजी सभापती भीमराव मेश्राम, भीमराव पाटील जुमनाके, माजी सरपंच हनुमंत कुमरे, युवा कार्यकर्ते मातीन शेख उपस्थित होते.