वरुड तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांकरिता ९७.४२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर !

66

🔸आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नामुळे टेंभनी, मांगोना, बाभूळखेडा, कुमुंदरा येथील पाणीप्रश्न निकाली !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.4फेब्रुवारी):- वरुड तालुक्यात पाणी टंचाई बाबत येत आलेल्या समस्याचे निराकरण करण्याकरिता पाणी टंचाई भविष्यात निर्माण होऊ नये याकरीता आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढाकार घेतला असून प्रत्येक वर्षी अधिग्रहनाच्या भरवशावर न बसता कायमस्वरूपी सोर्स निर्माण करणे गरजेचे असून जल जीवन मिशन अंतर्गत टंचाईग्रस्त गावातील प्रस्ताव सादर करून कायमस्वरूपी सोर्स निर्माण करण्याकरिता वरुड तालुक्यातील टेंभनी, मांगोना, बाभूळखेडा, कुमुंदरा येथील जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा मिळवण्यास आमदार देवेंद्र भुयार यांना यश आले आहे.

 वेळोवेळी पाठपुरावा करून, तांत्रिकदृष्ट्या योजनेचा सखोल अभ्यास करून पाणी पुरवठा योजनेच्या या कामांना ९७ लक्ष ४२ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे टेंभनी, मांगोना, बाभूळखेडा, कुमुंदरा या गावांची तहान भागणार आहे.वरुड तालुक्यातील टेंभनी येथील पाणी पुरवठा योजने करिता १७.९९ लक्ष रुपये, मांगोना येथील पाणी पुरवठा योजनेकरिता १३.२३ लक्ष रुपये , बाभुळखेडा येथील पाणी पुरवठा योजनेकरिता ४८.९३ लक्ष रुपये, कुमुंदरा येथील पाणी पुरवठा योजनेकरिता १७.२७ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून या चार पाणी पुरवठा योजनांच्या कामांकरिता ९७ लक्ष ४२ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.
आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड मोर्शी तालुक्यातील ड्रायझोन असलेल्या व पाण्याची टंचाई असलेल्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची कायम स्वरूपी सोय व्हावी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच जिल्हा परिषद अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेऊन प्रकल्पाचे आराखडे तयार करून लगेच तांत्रिक मान्यता देऊन प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवून टेंभनी, मांगोना, बाभूळखेडा, कुमुंदरा येथील पाणी पुरवठा योजनेकरिता ९७ लक्ष ४२ हजार रुपयांचा निधि उपलब्ध करून दिल्याबद्दल टेंभनी, मांगोना, बाभूळखेडा, कुमुंदरा येथील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.

ग्रामीण भागामध्ये नेहमी पाण्याची टंचाई भासत असतांना महिलांकडून पाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी होत होती. पाठपुरावा करत असतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे व संबंधित सर्वच मंत्री अधिकारी यांच्यासोबत बैठका घेऊन वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.
वरुड तालुक्यातील टेंभनी, मांगोना, बाभूळखेडा, कुमुंदरा या गावाचा पाणी प्रश्न ऐरणीवर होता. उन्हाळ्यात तर नेहमी पिण्याचे पाणी ग्रामस्थांना वेळेवर मिळत नव्हते. त्यावेळी नागरिकांची तहान भागविण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी टेंभनी, मांगोना, बाभूळखेडा, कुमुंदरा येथील पाणी पुरवठा योजनेला निधी मिळवून ही योजना कार्यान्वित करू असा टेंभनी, मांगोना, बाभूळखेडा, कुमुंदरा वासीयांना दिलेला शब्द त्यांनी पाळला आहे. या योजनेमुळे गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्यामुळे
टेंभनी, मांगोना, बाभूळखेडा, कुमुंदरा येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे .