राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ जिल्हा कार्यकारिणीची बैठक,सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित रहावे -. रामनाथ कांबळे

35

🔸बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांची नवीन युक्त्या होणार.!

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड (प्रतिनिधी) :- येथील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:30 वाजता राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ जिल्हा कार्यकारणी ची बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीत सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी व प्रदेशा अध्यक्ष विजयकुमार वाव्हळ यांच्या आदेशाप्रमाणे करण्यात आली आहे.असे की बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे नुकतीच राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ राज्यस्तरीय कार्यकारणी निवड बैठक संपन्न झाली.

असून या बैठकीत नवीन चेहऱ्यांना संधी देऊन राज्यस्तरीय व राज्यातील विविध विभागावरील यांची नियुक्ती करण्यात आली व जुन्या पदाधिकाऱ्यांचे प्रमोशनही करण्यात आले,त्या अनुषंगाने येत्या 06 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 :30 वाजता बीड जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ जिल्हा कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत जिल्हा स्तर व तालुका स्तरावरील सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून व नवीन सदस्यांची नोंदणी ही करण्यात येणार आहे.

या बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष दशरथ रोडे,प्रदेश संघटक भागवत वैद्य, मराठवाडा उपाध्यक्ष स.का.पाटेकर,बीड जिल्हा अध्यक्ष रामनाथ कांबळे, पोलिस मित्र समितीचे बीड जिल्हा अध्यक्ष तालिब शेख,ग्राम विकास समिती बीड जिल्हा अध्यक्ष उत्तम ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा कार्यकारणी निवड बैठक आयोजित केली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी या बैठकीत उपस्थित राहावे असे आवाहन ,पठाण अमरजान (मराठवाडा संघटक), रामनाथ कांबळे (नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष),ब्रह्मनाथ कांबळे (नवनिर्वाचित उपाध्यक्ष),इरफान शेख (नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष),इम्रान इनामदार यांनी केले आहे.