पॅंथर सुखदेव तात्या सोनवणे यांचा वाढदिवस भव्य काव्यमैफलने उत्साहात संपन्न

32

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.6फेब्रुवारी):-दलित पॅंथर महाराष्ट व नक्षञाचं देणं काव्यमंच,पुणे वतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन,पुणे येथे दलित पॅंथरचे महाराष्टराज्य प्रदेशअध्यक्ष सुखदेव तात्या सोनवणे यांचा वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय भव्य काव्यमैफल,मानपञ देऊन,भव्य नागरी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ चळवळीचे नेते वंसत साळवे म्हणाले की,”दलित पॅंथर जिवंत ठेवण्याचे काम व या पॅंथरच्या ज्योतीची मशाल करण्याचे काम सुखदेव सोनवणे यांनी केलेले आहे.त्यांच्या वाढदिवसाला सदैव शुभेच्छा..!”

यावेळी पुणे शहर अध्यक्ष प्रकाश साळवे,ज्येष्ठ पॅंथर अशोकअण्णा कांबळे,प्रा.राजेंद्र सोनवणे,शुभम सोनवणे,अशोक सोनवणे,निलेश आल्हाट,गोविंद साठे,अकबर आरबीयन,विकास भोसले,विकी विरोळकर,राजेंद्र गायीगवळी,आरती बारहाते,उषा राजगुरु,भावना गायकवाड,हसन पुनावाला,संदीप ओव्हाळ,चेतन दरेकर,अवी कुटे,राजेश म्हस्के इ.अनेक मान्यवर उपस्थित होते.राज्यस्तरी काव्यमैफल मध्ये दमदार कवी जगदीप वनशीव,अरुण कांबळे,रेश्मा उबाळे,चंद्रकांत जोगदंड,आनंद गायकवाड,प्रशांत निकम,सोनवणे,गायकवाड,माने,इ.नी बहारदार चळवळीच्या कवितांचे काव्यवाचन करुन मैफलीत रंग भरला.

आपल्या प्रकट मुलाखतीत सुखदेव तात्या सोनवणे यांनी महाकवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या सोबत घालविलेल्या अनेक प्रसंग व अनुभव सांगितले.पॅंथरच्या चळवळीच्या अनेक घडामोडीचा ही मी साक्षीदार आहे.पॅंथर ही आमच्या घरातच व रक्तातच आहे.नामदेव ढसाळ यांच्या विद्यापीठात मला खुप शिकायला मिळाले.त्यामुळे मला नामदेवदादामुळे पॅंथर जवळुन अनुभवता आली.त्यांचा मी विश्वासू सहकारी होतो.मुंबईच्या वास्तवाचा,अनेक मोर्चाचा साक्षीदार आहे.हि दलित पॅंथर यापुढे सर्व समावेश काम करणार आहे.सर्वांना सोबत घेऊन बहुजनांसाठी काम करत राहणार आहे.या कार्यक्रमाचे सूञसंचालन कवी वादळकार,कवी जगदीश वनशिव यांनी केले.प्रास्ताविक प्रकाश साळवे यांनी केले.आभार प्रदर्शन शुभम सोनवणे यांनी मानले.