हत्ती च्या मुखवट्या मागे लपली ५ वी ची मुलं…

34

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.8फेब्रुवारी):-येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल च्या ५ विच्या विद्यार्थांनी अतिशय सुंदर हत्तीचे मुखवटे तयार केले.मराठी विषयात गद्य आणि पद्य यातून भाषेचा आशय अभ्यासाला मिळत असतो. परंतु कधीकधी भाषेत कार्यशिक्षण अंतर्गत एखादा पाठ आला तर त्याची सुध्दा वेगळीच गंमत असते. गुड शेपर्ड स्कुल येथील इयत्ता ५ विच्या विद्यार्थांना मराठी विषया अंतर्गत ‘हत्तीचा मुखवटा’ हा पाठ आहे.

या पाठात हत्तीचा मुखवटा कसा तयार करावा? याची कृती दिलेली आहे. या कृतीच्या आधारे विद्यार्थांनी अतिशय सुबक हत्तीचे मुखवटे तयार केले. एरवी समाजात लोक अनेक प्रकारचे मुखवटे धारण करून फिरत असतात परंतु या निरागस मुलांच्या चेहऱ्यावर हत्तीचे मुखवटे अतिशय सुंदर दिसत होते. या विद्यार्थ्यांना मराठी विषय शिक्षक लक्ष्मण पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. अतिशय सुंदर आणि सुबक मुखवटे तयार केल्यानंतर त्यांच्या सोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, भारती तिवारी, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार यांच्यासह इयत्ता ५ वी चे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हत्तीचे मुखवटे धारण करून उपस्थित होते.