विवेक कुचेकर यांचा वंचित बहुजन आघाडीच्या बीड तालुका प्रसिद्धी प्रमुख पदाचा राजीनामा

26

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.8फेब्रुवारी):-तालुक्यातील बालाघाटावरील वंचित समुहाचा नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहीले जाते ते समाजसेवक विवेक(बाबा)कुचेकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या बीड तालुका प्रसिद्धी प्रमुख पदाचा जाहीर राजीनामा दिला आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, बीड तालुक्यातील बालाघाटावरील चौसाळा येथील रहिवासी असलेले विवेक कुचेकर हे गेल्या बारा वर्षापासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत भारीप बहुजन महासंघाचे चौसाळा शहर अध्यक्ष ते बीड युवक तालुका अध्यक्ष, जिल्हासहसंघटक इत्यादी पदावर पुर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम करत होते आता बीड तालुका प्रसिद्धी प्रमुख यापदावरती त्यांची निवड राज्य कमिटीने केली होती.

पंरतु मध्यतंरी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व ऊसतोड कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष समाजसेवक प्रा, शिवराज बागंर यांच्यावरती झालेल्या एमपीडीएच्या कारवाई संदर्भात प्रसिद्धी माध्यमातून व तसेच निवेदनाद्वारे आवाज उठविला म्हणून पदमुक्तीची कारवाई का करण्यात येवु नये अशा प्रकारची नोटीस बीड जिल्हा कमिटीने काढल्यामुळे विवेक कुचेकर यांनी स्वता वंचित बहुजन आघाडीच्या बीड तालुका प्रसिद्धी प्रमुख पदाचा राजीनामा बीड जिल्हाध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द केला आहे.विवेक कुचेकर यांनी आज पंर्यत गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठी विविध आंदोलने,मोर्चे,निदर्शने आंदोलन करून गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे तसेच 2020 च्या ऊसतोड कामगारांच्या संपात ऊसतोड मजुराच्या गाडया रोखुन धरल्यामुळे त्याना अटक झाली होती स्थानिक पातळीवरील विषय आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला धारेवर धरून सोडवण्याचा प्रयत्न ते सतत करत असतात बारा वर्षापासून आंबेडकरी घराण्याशी एकनिष्ठ राहुन बालाघाटावरील वाडी वस्ती तांडयावर पक्षाचे विचार पोहचवुन गाव तेथे शाखा स्थापन केली होती.

पंरतु नुतन बीड जिल्हा अध्यक्ष यानी सामाजिक चळवळीत काम करत असलेल्या व वंचित बहुजन आघाडीच्या ऊसतोड कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष प्रा,शिवराज बागंर यांच्यावरती चुकीच्या झालेल्या एमपीडीए कारवाई विरोधात पक्षाला कुठल्याही प्रकारची सुचना न देता प्रसिद्धी माध्यमातून व तसेच आत्मदहनासारखा मार्ग पत्करावा लागेल असा ईशारा प्रशासनाला दिला होता यामुळे बीड जिल्हा अध्यक्ष यानी कारणे दाखवा नोटीस काढल्यामुळे विवेक( बाबा) कुचेकर वंचित बहुजन आघाडीच्या बीड तालुका प्रसिद्धी प्रमुख पदाचा जाहीर राजीनामा दिला आहे.यामुळे विवेक कुचेकर यांचा पुढील निर्णय काय असेल याकडे सर्वांच्या नजरा आहेत कुचेकर यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाचे नुकसान झाले आहे अशी चर्चा राजकिय वर्तुळात चर्चीली जात असुन जुने निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले आहेत