ॲपे ऑटो उलटून दोन गंभिर जखमी

33

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.9फेब्रुवारी):- परभणी रोडवरील चौधरी पेट्रोल पंपाजवळ असलेल्य वळण रस्त्यावर समोरून वेगाने येणा-या टेम्पो समोरा समोर होणार अपघात चुकवण्यासाठी ऑटो चालकाने जागेवर ब्रेक दाबल्याने दि.८ फेब्रुवारी रोजी दुपारी दिड वाजता ॲपे पलटी होऊन ऑटोतील दोन प्रवाशी गंभिर जखमी झाल्याची घटना घडली . या आपघात एक महीला व एक पुरूष गंभिर जखमी झाले.

धसाडी येथुन गंगाखेड कडे तिन महीला व चार पुरूष प्रवाशी असे सात प्रवाशी घेऊन धसाडी येथुन गंगाखेडला येत आसतांना समोर आलेल्या टिम्पोने अँटो क्रमाक Mh22AP1287 या ऑटोवर धडकणार तेवढ्यात ऑटो चालकाने ब्रेक दाबल्याने जागीच ऑटो पलटी झाला.भरधाव वेगाने येणारा टेम्पो परभणीकडे निघुन गेला. यात सुर्यकांत काशीनाथ कटाळे रा.खळी वय ४५ यांना पूर्ण शरीराला मार लागला व कुंजुबाई बालासाहेब शिंदे वय ५८वर्ष रा.धसाडी यांना डोक्याला व छातीला गंभिर मार लागला असुन यांच्यावर गंगाखेड उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकिय अधिकारी डाँ केशव मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली गंगाखेड उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे.