जिल्ह्यातील प्र पत्र ड यादितिल ३४ हजार लाभार्थी घरकुल योजनेतुन अपात्र.!

29

🔸फेर चौकशी करुन गरजु लोकांना घरकुल योजनेचा लाभ द्या. स्वाभिमानीची मागणी.!

✒️अंबादस पवार(विशेष प्रतिनिधी)

संग्रामपूर(दि.10फेब्रुवारी):- जि. बुलढाणा प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत, गरजू लोकांना घरकुल दिल्या जाते. परंतु गेल्या काही दिवसापासून घरकुल लाभार्थ्यांना, या घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्याचे काम हे शासन दरबारी होतांना दिसून येत आहे. वेगवेगळे एक्सल्यूजन निकष लावून अत्यंत गरजु नागरिकांना घरकुला पासून वंचित ठेवले जात आहे. संग्रामपूर तालुक्यासह बुलडाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत प्र पत्र ड यादितिल ३४६२६ लोकांना अपात्र केले आहे. या लाभार्थ्यांचे फेर सर्वे करून पात्र लोकांना घरकुल योजनेचा लाभ द्या. अशी मागणी आज स्वाभिमानीने पं.स.मार्फत जिल्हा परिषद कडे निवेदनातून केली आहे.

घरकुल रद्द करण्यामध्ये संग्रामपूर तालुक्यात २०५५ घरकुल, जळगाव तालुक्यामध्ये १२३५, शेगाव तालुक्यामध्ये ८३५, बुलडाणा तालुक्यात ४८४६, चिखली तालुक्यात ५२६०, देऊळगावराजा तालुक्यात १७२१, खामगाव तालुक्यात २८५१, लोणार तालुक्यात १४१२, मलकापूर तालुक्यात २४८०, मेहकर तालुक्यात ४१२५, मोताळा तालुक्यात १८८९, नांदुरा तालुक्यात २२८२ आणि सिंदखेडराजा तालुक्यात ३६३५ घरकुल आतापर्यंत रद्द करण्यात आलेले आहेत. वास्तविक यामध्ये भूमिहीन, बेघर असलेल्या गरजू लोकांना अपात्र केले आहे. एक्सल्यूजन निकषात तातडीने दुरुस्ती करून रद्द झालेल्या सर्व घरकुल लाभार्थ्यांचा पुन्हा सर्वे करून न्याय द्यावा. तसेच शासनाकडून लाभार्थ्यांना १ लाख ३८ हजार दिले जातात.

महागाई वाढल्याने शासनाने प्रती घरकुल लाभार्थांना २ लाख रुपये दिले पाहीजेत, आधार बेस पेमेंट मुळे FTO करताना चुकीच्या खात्यात पैसे जमा होतात, त्यामुळे आधार बेस पेमेंट न करता डायरेक्ट बँक खात्यात टाकान्यात यावे, दिव्यांग नागरिकांना व विधवा महिलांना प्राधान्याने घरकुल योजनेतून लाभ देण्यात यावे. तसेच nic नुसार ज्या गरजू लाभार्थ्यांचे सिस्टीम ने घरकुल अपात्र केले .. त्या घरकुलांचा पुनच्छ सर्वे करून पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा. अनेक वर्षांपासून अतिक्रमण जागेवर वास्तव्यास असलेल्या लोकांचे नियमाकुलचे प्रस्ताव कार्यालयात धुर खात पडुन आहेत.

हे प्रस्ताव निकाली काढुन त्यांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा. मागण्यांची दखल न घेतल्यास स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात १५ फेब्रुवारी पासून संग्रामपूर पंचायत समिती समोर घरकुल लाभार्थ्यांना सोबत घेऊन बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे. या निवेदनावर स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष अनंता मानकर, विजय ठाकरे,समाधान सोनोने, नयन इंगळे आशिष सावळे, राजेश उमाळे, भास्कर तांदळे, श्रीकृष्ण मसुरकर, गोकुल गावंडे, सागर देशमुख, मोहम्मद शहा, रामदास सरदार, हरिदास मारोडे, शिवाजी बगाडे,दत्ता चितोळे व बहुसंख्य घरकुल लाभार्थी उपस्थित होते.