बिडीएस आँनलाईन प्रणाली ठरते कर्मचा-यांना डोकेदुखी

37

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.12फेब्रुवारी):-शासनाने कर्मचा-यांना विविध देयकाची रक्कम त्यांचे खात्यावर वर्ग करण्यासाठी बिडीएस आँनलाईन प्रणाली सुरू केली. परंतु मागील एक वर्षांपासून या पद्धतीला ग्रहण लागले आहे. यामुळे बिडीएस आँनलाईन प्रणाली कर्मचा-यांना डोकेदुखी ठरत आहे.

शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात असलेली रक्कम त्यांच्या अत्यंत गरजेच्या वेळेस काढण्याची मुभा आहे.घरबांधणी, मुलामुलीचे लग्न या कामाकरिताच भविष्य निर्वाह निधीची रक्कम काढता येते. रक्कम काढू नये म्हणून अनेक कागदपत्रे याकरिता जमा करावे लागतात. एवढे सर्व करून जेव्हा रक्कम मंजूर होते तेव्हा बिडीएस आँनलाईन प्रणाली बंद असल्याने शिक्षकांना ही रक्कम मिळू शकत नाही.

अनेक शिक्षकांनी मुलांच्या लग्न करिता भविष्य निर्वाह निधी मागणी केली. परंतु लग्न होऊन देखील रक्कम मिळाली नाही. काहींचे घर बांधून झाले. वास्तुपूजन करायचे आहे, परंतु अजूनही भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळाली नाही. लोकांकडून कर्जाची घेतलेली रक्कम परत करण्यास तगादा लावल्या जात आहे. असे असताना आता जीव द्यावे की काय अशी परिस्थिती बिडीएस आँनलाईन प्रणाली बंद असल्याने पीडित कर्मचा-यांची झालेली आहे.

सेवानिवृत्ती नंतर संपूर्ण सेवेत कपात करून ठेवलेली रक्कम सेवनिवृत्तीला उपयोगट पडावी म्हणून शिक्षक भविष्य निर्वाह निधी कपात करत असतात. सेवानिवृत्त झालेल्या अनेक शिक्षकांची भविष्य निर्वाह निधी रक्कम सेवानिवृत्त होऊन दीड वर्ष झाले. परंतु बिडीएस आँनलाईन प्रणाली बंद असल्याने रक्कम मिळू शकली नाही. त्यामुळे बिडीएस आँनलाईन प्रणाली कर्मचा-यांना डोके ठरत आहे. ही प्रणाली पूर्ण वेळ सुरु ठेवावी अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती जिल्हा शाखा चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष नारायण कांबळे, गोविंद गोहणे, रवी सोयाम, जनार्धन केदार, रवी वरखेडे आदीने केली आहे.