मुस्तापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

90

✒️नायगाव,तालुका प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)

नायगाव(दि.17फेब्रुवारी):- तालुक्यातील मुस्तापूर येथिल हनुमान मंदिरावर अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

अखंड हरिनाम सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पाहटे 4ते 6 काकडा 6ते8 महारूद्र अभिषेक 8ते10 पारायण 10ते 11 गाथा भजन 11ते 2 पगंतप्रसाद 2ते 3 प्रवचण 4ते6 हरिपाठ 6ते8 महाप्रसाद 8ते 11 हरीकिर्तन व हरिजागर या कार्यक्रमात परिसरातील नामवंत गायक वादक किर्तनकार याची उपस्थिती लाभणार आहे.

यासोबतच दररोज महाप्रसाद भजन अभंग पद भारूड गवळणी समाजप्रबोधन आदींसह कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न होणार आहेत तरी परिसरातील संत भाविक टाळकरी माळकरी साधू संत महंत उपस्थितीत राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळ मुस्तापूरच्या वतीने करण्यात आले आहे...