जिल्ह्यात शिवजन्मोत्सव उत्साहात

60

🔹यूवा संकल्प संस्थेतर्फे अभिवादन

✒️भास्कर फरकडे(तालुका,प्रतिनिधी चामोर्शी)

चामोर्शी(दि.21फेब्रुवारी):-कोरोना संक्रमण नियंत्रणात असल्याने जिल्हा प्रशासनाने यावर्षी शिवजयंती उत्सव साजरा करण्यास परवानगी दिली. मात्र ही परवानगी देताना रैली, मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली होती. अशा स्थितीत जिल्ह्यात शासकीय, निमशासकीय कार्यालय, विविध राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना, शिवप्रेमीद्वारे ठिकठिकाणी शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

कोरोना नियमावलीचे तंतोतंत पालन करीत ठिकठिकाणी कार्यक्रम पार पडले.स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यूवा संकल्प संस्थेतर्फे जिल्हात विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. यावेळी युवा संकल्प संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वैरागडे, यांच्या सूचनेनुसार चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाखेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली………………