मोर्शी येथे मराठा सेवा संघातर्फे विविध उपक्रम राबवून शिवजयंती उत्सव साजरा !

30

🔹हृदयातल्या शिवरायांना कृतीत उतरवने हीच खरी शिवजयंती — डॉ आशिष लोहे 

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.21फेब्रुवारी):-अखंड हिंदुस्थानाचे आराध्या दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज 392 वी जयंती पूर्ण देशामध्ये साजरी होत आहे. या दिवशी विविध उपक्रम राबवून आपल्या राजाला अभिवादन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व मोर्शी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही विविध उपक्रम राबवून छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ व्या जयंती निमित्त शिव जयंती उत्सव सोहळा व घरगुती शिव जयंती सजावट स्पर्धा, सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ आशिष लोहे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिदासजी गेडाम, प्रमुख वक्ते डॉ आशिष लोहे, प्रमुख अतिथी माजी पंचायत समिती सभापती दीपक पांडव, डॉ गजानन पाटील, डॉ भूषण टाके, राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

शेतकरी जगाचा पोशिंदा असून शेतकरी जगला तरच आपण जगू हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणले होते, म्हणून त्या काळात दुष्काळात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली होती. विद्यार्थी हे खेड्यातूनच घडतात. त्यासाठी खेड्यातील विद्यार्थी यांना हे बाळकडू शिवचरित्र वाचनातून मिळते. हे सांगतांना प्रत्येक घरातील स्‍त्रियांनी राष्ट्रमाता जिजाऊ, तर वडिलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतची माहिती दिली तर नक्की प्रत्येक घरातील मुलां-मुलींमध्ये धाडसाचे बळ निर्माण होऊन राष्ट्रउभारणीस मदत होईल, हृदयात जपलेल्या शिवरायांना कृतीत उतरवने म्हणजे खरी शिवजयंती साजरी करणे होय, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ आशिष लोहे यांनी केले. सध्या देशावर कोरोनाचे मोठं संकट आलं आहे. या संकटापासून सुटका करण्यासाठी देखील यावेळी प्रार्थना करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ संदीप राऊत, जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष शारदा विधळे, कार्याध्यक्ष संदीप रोडे, उपाध्यक्ष रुपेश वाळके, निखिल चिखले, सचिव श्रीकांत देशमुख, कोषाध्यक्ष रवींद्र जाणे, प्रवक्ता दिलीप म्हाला, संघटक गगजानन चौधरी, सहसंघटक चक्रधर ठवळी, छत्रपती भुयार, रुपेश मेश्राम, जीवन देशमुख, मोरे सर, नंदकिशोर तिडके, संदीप भदाडे, विशाल लांडे, मार्गदर्शक शरदराव विधळे, विजयराव कोकाटे, प्रवीण राऊत, विशाल लांडे, संकेत इंगळे, पंकज राऊत, दीपक गोतमारे, मिलिंद हेडऊ, स्नेहल सांगोले,दिपाली विधळे, छाया वानखडे, डॉ.मृदुला वानखडे, डॉ.ग्रीष्मा मुळे, सोनाली खोपे, विभा इंगळे, शुभांगी भुयार, अर्चना विघे यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप रोडे यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचे आभार मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ संदीप राऊत यांनी मानले.