कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीच्या बीड महिला जिल्हाध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल

29

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.23फेब्रुवारी):-सासूच्या सांगण्यावरून पतीने विवाहितेला मारहाण केल्याची घटना बीडच्या अंबाजोगाईत घडली आहे.
या प्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा संगीता तुपसागर यांच्यासह पीडितेचा पती भुजंग भुतावळे या दोघांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपींमध्ये राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा होत आहे. संगीता तुपसागर या पीडितेच्या मानलेल्या सासू आहेत.राष्ट्रवादीच्या बीड जिल्हा महिला जिल्हाध्यक्षांवर त्यांच्याच दत्तक घेतलेल्या मुलाच्या पत्नीने मारहाणीसह इतर गंभीर आरोप केले आहेत.

अंबाजोगाईच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत पीडित महिलेने सदरचे आरोप केले आहेत. दरम्यान ‌‌याप्रकरणी ‌‌‌शहर‌ पोलीस ठाण्यात रितसर ‌‌‌तक्रार दिली असल्याचेही पीडित महिलेचे म्हणणे आहे. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ‌‌पीडित महिलेने सांगितले की, बीड जिल्हा राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा संगिता तुपसागर यांनी ‌त्यांच्या दत्तक घेतलेल्या मुलाचे पहिले‌ लग्न झालेले असतानाही अंधारात ‌‌‌‌‌‌‌‌‌ठेवून, खोटी माहिती देऊन १९ सप्टेंबर २०२१ ला ‌‌‌‌‌‌‌लग्न लावून दिले. लग्नानंतर त्या गेली पाच‌ महिने‌ घरातील सर्व ‌‌‌‌‌‌कामे करुन घेत असून जाणूनबुजून संगिता तुपसागर आपल्याला मारहाण करून त्रास देत आहेत. कधी अंगावर गरम पाणी टाकणे तर कधी वाटेल ती धमकी त्या देत आहेत. या गोष्टींना कंटाळून शहर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे.‌