चामोर्शी:- राजे धर्मराव हाॅयस्कुल अडपल्ली (माल) येथे गाडगे महाराज जयंती साजरी

59

✒️भास्कर फरकडे(तालुका प्रतिनिधी,चामोर्शी)

चामोर्शी(दि.24फेब्रुवारी):-राजे धर्मराव हाॅयस्कुल अडपल्ली (माल), येथील विद्यालयात संत गाडगे महाराज यांची १४६ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राजे धर्मराव हाॅयस्कुलचे मुख्याध्यापक नारायण बोरकुटे, होते. याप्रसंगी रथींन्द्र सरकार,जाईद शेख,मंटू सरकार, मेघश्याम भोयर,दिपक नाईकवार,आदि शिक्षक, व शिक्षकेतर, कर्मचारी, उपस्थित होते.

यावेळी बोरकुटे म्हणाले, गाडगे बाबा थोर समाज सुधारक असून ते आपल्या कृतीतून समाजाला संदेश देतात. ते स्वच्छतेचे उपासक, महामानव, दलितांचे कैवारी, गरिबांचे सेवेकरी होते. त्यांनी आयुष्यभर गावोगावी फिरून स्वच्छता तर केलीच शिवाय कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची मनेही साफ करण्याचे काम केले. यावेळी पुजा भोयर,पवनी मेश्राम,विध्या गुरनुले,स्वाती पुष्पलवार, गौरव मोहुर्ले,दिक्षा डाखोटे, संजीवनी चांदेकर,वैष्णवी झाडे, रामकृष्ण आत्राम, या विद्यार्थांनी गाडगे बाबांबद्दल विचार मांडले. तर राजे धर्मराव हाॅयस्कुल शाळेतील मुलींनी बाबांची गीतं सादर केली. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या भजनाने संपूर्ण शालेय परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.कल्पना गुंडावार, यांनी,तर सूत्रसंचालन सुरेश ब्राह्ममणकर, यांनी केले तर आभार यादव मडावी, यांनी मानले.