मोर्शी तालुक्यात आमदार देवेंद्र भुयार यांनी उपलब्ध करून दिला २ कोटी रुपयांचा निधी !

55

🔸आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नामुळे १९ गावातील रस्ते पूर्णत्वास जाणार !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.26फेब्रुवारी):- तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून ते रस्ते दुरुस्त करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार सतत प्रयत्नशील असून त्यांनी ग्रामीण भागातील रस्ते विकास व दुरुस्तीच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून घेतलेला आहे.मोर्शी तालुक्यामध्ये १९ गावातील सिमेंट काँक्रिट रस्ते निर्माण करण्यासाठी २ कोटी रुपये निधी मंजूर केला असून लवकरच मोर्शी तालुक्यातील रस्त्यांची कामे पूर्ण होणार असल्याची असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी दिली.

मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या पाठपुराव्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील सिमेंट रस्ता पेव्हर ब्लॉक विकासकामांना चालना देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी 2 कोटींचा प्रस्ताव सादर केला होता आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन मोर्शी तालुक्यातील १९ गावातील विकसकामांकरिता 2 कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे.मोर्शी तालुक्यातील अनेक विकासकामे पूर्ण करण्याकरिता आमदार देवेंद्र भुयार यांचा पाठपुरावा सुरू आहे.

मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध विकासकामे पूर्ण करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी कंबर कसली असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत हिवरखेड, दापोरी, डोंगर यावली, पाळा, खानापूर, उतखेड, खेड, तरोडा, आष्टोली, कोळविहिर, पर्डी, सिंभोरा, पिंपळखुटा, निंभी, तळणी, येरला, रिद्धपुर, दाभेरी, या गावांकरिता प्रत्येकी १० लक्ष रुपये, अंबाडा येथे २० लक्ष रुपये मंजूर करून सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक, सिएनबी स्मशानभूमी व इतर महत्त्वाच्या विकासकामांसाठी२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे.

मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करून पाठपुरावा केला होता. मोर्शी तालुक्यातील या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आमदार देवेंद्र भुयात यांनी मोर्शी तालुक्यातील रस्ते विकासाकरिता निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मोर्शी तालुक्यातील नागतिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.