मोफत कृत्रिम अवयव हात व पाय वितरण शिबीरा चे आयोजन

29

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.27फेब्रुवारी):-भोलारामजी कांकरिया बहुउद्देशीय चॅरीटेबल ट्रस्ट गंगाखेड व नारायण सेवा संस्थान उदयपूर (राजस्थान )यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दिव्यांग कृत्रिम अवयव मापन शिबिर 1मार्च 2022रोजी सकाळी 9वाजता पूजा मंगल कार्यालय गंगाखेड येथे आयोजन करण्यात आले आहे.श्री संत जनाबाई यांच्या पावन जन्मभूमीत स्वर्गीय कै.भोलारामजी कांकरिया यांच्या 45 व्या स्मृतिप्रीत्यर्थ भोलारामजी कांकरिया बहुउद्देशीय चॅरीटेबल ट्रस्ट गंगाखेड व नारायण सेवा संस्थान उदयपूर (राजस्थान )यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दिव्यांग शिबिर व कृत्रिम अवयव मापन शिबिर दिनांक 12 डिसेंबर 2021 रोजी घेण्यात आले होते.

सदर शिबिरात 300 दिव्यांगाची मोफत तपासणी करून 80 दिव्यांगांना कृत्रिम अवयव हात व पाय देण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली होती व मोफत ऑपरेशन साठी निवड करण्यात आली होती. “भूमी पेक्षा आई श्रेष्ठ आहे तर स्वर्गापेक्षा वडील श्रेष्ठ “हा विचार मनात घेऊन दिनांक 1 मार्च 2022 रोजी मोफत कृत्रिम हात पाय अवयव वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमती आंचलजी गोयल, जिल्हाधिकारी परभणी यांच्या शुभहस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात येत आहे. 1 मार्च 2022 रोजी शिबिरासाठी दिव्यांग व्यक्तीचे आधार कार्ड दिव्यांग प्रमाणपत्र, पास फोटो घेऊन यावे असे आव्हान कार्यक्रमाच्या संयोजिका मंजुषा ताई दर्डा (बी केबीसी ट्रस्टच्या सचिव) यांनी केले आहे.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुधीरजी पाटील, उपविभागीय अधिकारी, श्री श्रेणिकजी लोढ़ा, उपविभागीय पोलिस अधीक्षक, डॉक्टर हेमंत जी मुंडे, वैद्यकीय अधीक्षक ,डॉक्टर सिद्धार्थ जी भालेराव, प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ, विजयकुमार जी तापडिया ,नगराध्यक्ष गंगाखेड़,घनश्यामजी मालपाणी ,अध्यक्ष महेश बँक ,डॉक्टर मनिषजी बियानी, अस्थिरोग तज्ञ ,श्री सुभाषचंद गेलड़ा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.सदर शिबिराचे साधक श्री हरिप्रसाद लड्डडा व त्यांचे उदयपुर चे सहकारी या शिबिरातीसाठी उपस्थित राहणार आहेत.
तर ज्यांची निवड झालेली आहे त्या सर्व दिव्यांग बंधू आणि भगिनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आव्हान मंजुषा ताई दर्डा यांनी केले आहे.