जिल्हयात ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची सुरुवात

36

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.27फेब्रुवारी):-रविवारी दिनांक 27 फेब्रुवारी 2022 ला पल्स पोलिओ माहिमेचे उद्घाटन महिला रुग्णालय, गडचिरोली येथे खासदार अशोक नेते यांचे हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, डॉ. सोयाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.साळवे, जिल्हा स्तरीय नोडल अधिकारी पंकज हेमके उपसिथत होते. प्रा.आ. केंद्र कुनघाडा येथील पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन आमदार डॉ. देवराव होळी यांचे हस्ते संपन्न झाले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अॅड.रामभाव मेश्राम, जिल्हास्तरीय नोडल अधिकारी पंकज हेमके, डॉ.प्रुफुल्ल हूलके, तालुका आरोग्य अधिकारी, उपस्थित होते तर डॉ. कमल यांनी प्रा.आ. केंद्र कुनघाडा, प्रा.आ. केंद्र आमगांव, तालुका चामोर्शी यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच प्रा.आ. केंद्र बोदली येथे पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल श्रीहरी साळवे यांचे हस्ते करण्यात आले. पल्स पोलिओ लसीकरणाचे काम एकूण 2255 बुथ, 131 ट्रॉझीस्ट टीम, 95 मोबाईल टिम द्वारे पार पाडण्यात आले. 0 ते 05 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना पल्स पोलिओचे लसीकरण करण्यात आले. पल्स पोलीओ लसीकरणाचे मागील तीन वर्षामध्ये सरासरी 97 टक्केवारी आहे. मात्र मागील सरासरीच्या आसपास पोहचण्यात आरोग्य विभागाला यश येईल असे मत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी व्यक्त केले. यावेळीचा अहवाल सायंकाळी उशिरापर्यंत हाती येईल असेही संबंधित विभागाकडून कळविण्यात आले आहे.