शिक्षक कला मंच मूलला पुरस्काराने गौरविण्यात आले

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.27फेब्रुवारी):-शिक्षक कला मंच मूल दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करून विविध कलांची जोपासना करीत प्राथमिक शिक्षकांना एकतेत बांधण्याचे व सांस्कृतिक वारसा जोपासण्याचे कार्य करते . याची दखल घेऊन संपूर्ण भारतात एकात्मतेसाठी कार्य करणाऱ्या अखिल भारतीय परिवार पार्टी दिल्ली तर्फे शिक्षक कला मंच मूल ला गर्व से कहो हम भारतीय है पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .

२६ फेब्रुवारी २०२२ ला धनश्री बँकेच्या डॉ. हेडगेवार सभागृह मूल येथे आयोजित कार्यक्रमात स्मृतिचिन्ह ,प्रशस्तीपत्र व उचित सन्मान देऊन मंचाला गौरविण्यात आले . यावेळी अखिल भारतीय परिवार पार्टी दिल्लीचे गणेश रामटेके भारतीय व इतर मान्यवर उपस्थित होते . पुरस्कार घेण्याकरिता शिक्षक कला मंच मूल च्या सिंधू गोवर्धन व रत्नमाला गेडाम सह मंचाचे सभासद उपस्थित होते .

शिक्षक कला मंच मूलला पुरस्काराने गौरविल्याबद्दल मूल पंचायत समितीचे मान .संवर्ग विकास अधिकारी मान. गटशिक्षणाधिकारी , माननीय सर्व विस्तार अधिकारी , मान. सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख मान. लक्ष्मण सोयाम , सुनीता बुटे ,नंदकिशोर शेरकि ,सुंदर मंगर , भास्कर रामटेके , जगदीप दुधे , जितेंद्र लेनगुरे , रजनी रामगिरवार , कविता रोकमवार , भाग्यलक्ष्मी रणदिवे , प्रमोद मडावी , परमानंद जेंगठे , लक्ष्मण खोब्रागडे, नागेंद्र नेवारे , सुनील खंडारे , सिंधू गोवर्धन , चंदा गेडाम , सुनील निमगडे, डॅनिअल देवगडे, जगदीश गेडाम , किशोर उरकुंडवार , रत्नमाला गेडाम , उत्तम गोवर्धन,चंदन बिलवने,लखन साखरे,माणिक पाटेवार,कैलास कोसरे , केदार सोनूले , नितीन खाडीलकर , छत्रपती देशमुख , गीता मेश्राम, वैशाली महाकाळकर, फुलचंद गोंगले, अखिल भारतीय परिवार पार्टी आदींनी अभिनंदन केले .